आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया:उणे 30  अंशातही पाणी गोठले नाही

मॉस्को2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाच्या सैबेरियातील तापमान उणे ३० अंशावर पोहोचले आहे. असे असतानाही क्रास्नोयार्स्क शहरातील येनजी नदीचे पाणी अद्याप गोठले नाही. रशियाने या नदीवर जलविद्युत प्रकल्प स्थापन केला आहे. यामुळे वार्षिक हजारो गॅलन गरम पाणी सोडले जाते. त्यामुळे नदीचे ३०० किमी पात्र हिवाळ्यातही गोठत नाही. हिवाळ्यात थंड हवा उष्ण नदीच्या पाण्यासोबत मिळून धुके होते. हे क्रास्नोयार्क व अन्य सखल भागात पसरते. येथील पारा उणे ५० अंश सेल्सियसपर्यंत घसरतो.

14 मीटर या नदीची सरासरी खोली आहे. लांबी ५५४० किमी. मंगोलियाच्या सायन पर्वताचा उगम असलेली नदी रशियात प्रवेश करते. ही आर्क्टिक महासागराला जाऊन मिळते. ही जगातील पाचवी सर्वात लांब नदी आहे.

बातम्या आणखी आहेत...