आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Water From The Snow, A Terrible Crisis Of Electricity In US

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका:बर्फवृष्टीने पाणी, विजेचे भीषण संकट, पाण्यासाठी धडपड; पंपहाऊसवर कारच्या रांगा

न्यूयॉर्क15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोठवणाऱ्या थंडीत टेक्सासची निम्मी लोकसंख्या अंधारात

जगातील महाशक्ती अमेरिकेतील नागरिकांच्या समस्या संपायला तयार नाहीत. कोरोना असतानाच गेल्या वर्षी मध्यावर अन्नधान्याचा तुटवडा जाणवल्याने लोकांवर अन्नाची पाकिटे घेण्यासाठी रांगा लावण्याची वेळ आली होती. आता पुन्हा अशीच छायाचित्रे समोर आली आहेत. या वेळी टेक्सास राज्यात आठवड्यापूर्वी आलेल्या हिमवादळामुळे भीषण थंडी पडली आहे. वादळानंतर राज्यातील मोठ्या पाच विभागांतील वीजपुरवठा खंडित झाला. आता पाण्याच्या संकटासोबत इतर अडचणीही जाणवू लागल्या आहेत. प्रचंड थंडीमुळे जलवाहिन्या तडकल्या. फुटून वाहू लागल्या. त्यामुळे लोकांवर पाण्याविना राहण्याची वेळ आली.

टेक्सास राज्याची एकूण लोकसंख्या २.९ कोटी आहे. त्यापैकी सुमारे निम्मी लोकसंख्या या संकटाला तोंड देत आहे. ह्यूस्टनच्या एका स्टेडियमबाहेर पाण्याच्या बाटल्या मिळवण्यासाठी शेकडो रांगा लावल्याचे हे छायाचित्र आहे. शुक्रवारपर्यंत टेक्सासची १००० सार्वजनिक पाणी व्यवस्था कोलमडली आहे. त्याचा फटका सुमारे १७७ भागात पाण्याचा पुरवठा खंडित झाला. बर्फामुळे विविध दुर्घटना व थंडीमुळे अमेरिकेत ५८ जणांचा मृत्यू झाला आहे.

सामान्य लोकांवर आता बर्फ उकळून पाणी पिण्याची वेळ
पाण्याचा पुरवठा होत नसल्याने लोक आता पिण्याच्या पाण्यासाठी बर्फ उकळू लागले. ते थंड झाल्यावर तहान भागवली जात आहे. बाटलीबंद पाण्यावरही अनेक लोक अवलंबून आहेत. परंतु बर्फ गरम करून त्याचे पाणी धोकादायक ठरू शकते, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.

जलवाहिन्या फुटल्याने छतांची हानी, पंख्यातून बर्फाचा झरा
काही लोक हिमवृष्टीमुळे घरेदारे सोडून गेली होती. परतल्यानंतर त्यांना घराच्या छतामध्ये गळती झाली विक्रमी नीचांकी तापमानामुळे घरातील जलवाहिन्या फुटल्या. घरांच्या छतांमध्ये भेगाही पडल्या. एवढेच नव्हे तर सीलिंग पंख्यातून पाझरलेले पाणी गोठल्याचे दिसून आले.