आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानातील विरोधी पक्षनेतेे इम्रान खान विरोधात ११ महिन्यांत १०० गुन्हे दाखल झाले. राजकारणासाठी अपात्र ठरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. टाइमच्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. संकटांवर मात करण्यासाठी तुमच्याकडे काही योजना आहेत, यावर ते म्हणाले, २००९ मध्ये श्रीलंका संघावरील अतिरेकी हल्ल्यानंतर पाकमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला गेला नव्हता. मी २०१९ मध्ये कसोटी सामना खेळवला. यातून स्थिती समान्य असल्याचा संदेश गेला. परिस्थिती जितकी सामान्य असते तेवढी गुंतवणूक वाढते.
{अार्थिक संकटाचे मूळ कारण काय आहे ? आम्ही जितकी निर्यात करतो त्यापेक्षा जास्त खरेदी करतो. कोणत्याच सरकारने निर्यात वाढवण्यावर लक्ष दिले नाही. अर्थव्यवस्था वाढते तेव्हा आयात वाढते आणि आपल्याला डॉलरच्या संकटाचा सामना करावा लागतो. २२ कोटी लोकसंख्येमध्ये केवळ २५ लाख करदाते आहेत. श्रीमंत लोक कर भरत नाहीत.
{अमेरिकेच्या दबावाखाली सरकार गेल्याची चर्चा कितपत खरी आहे? इम्रान यांना पंतप्रधानपदावरून हटवले नाही तर त्याचा फटका बसेेल, असा इशारा अमेरिकेचे सहाय्यक परराष्ट्र सचिव डोनाल्ड ल्यू यांनी पाकिस्तानच्या राजदूताला दिला. दुसऱ्या दिवशी संसदेत अविश्वास प्रस्ताव मांडला जातो.
{ सेनेशी तुमचे संबंध कुठे बिघडले ? भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रभावशाली कुटुंबांवर कारवाई करण्यास लष्कराच्या जनरल्सच्या अनिच्छेने संबंध बिघडले. सरकार- सेनेने काेविडमध्ये चांगले काम केले. परंतु भ्रष्टाचाराविरुद्ध उत्तरदायित्वाला विरोध केला. अमेरिका समर्थक लष्करी अधिकाऱ्यांना सतत अमेरिकेला लक्ष्य करणे पसंत नव्हते.
{तुम्हाला स्वतःच्या हत्येची भीती का वाटते? मी साडेतीन वर्षे पीएम राहिलो. मला गुप्तचर संस्थांमधून माहिती मिळते.मी हल्ल्याच्या दीड महिना आधी माझ्या जिवाला धोक असल्याचे म्हटले होते. या हल्ल्याला विद्यमान सरकारचे तीन लोक जबाबदार आहेत, असे माझे मत आहे. आता आणखी हल्ले होऊ शकतात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.