आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • We Will Take Military Action Against China If It Attacks Taiwan: Joe Biden; The United States Formed A Group Of 13 Countries, Including India, Before The Quad Summit

अमेरिकेचा इशारा:तैवानवर हल्ला केल्यास चीनविरुद्ध लष्करी कारवाई करू- जो बायडेन, भारतासह 13 देशांचा गट बनवला

टोकियोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तैवानवर हल्ला केल्यास अमेरिका त्याच्या बचावासाठी लष्करी हस्तक्षेपाचा विचार करू शकते, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी चीनला दिला. ते म्हणाले, चीनने तैवानमध्ये बळाचा वापर करू नये यासाठी अमेरिका इतर देशांसोबत लक्ष ठेवून असेल. बायडेन म्हणाले, तैवानच्या सीमेवरून उड्डाण करून चीन धोका पत्करत आहे.

टोकियोमध्ये क्वाड संमेलनासाठी आलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जपानचे पंतप्रधान किशिदा फुमियो यांची भेट घेतल्यानंतर सांगितले की, ‘आम्ही सर्व चीनबद्दलच्या धोरणाशी सहमत आहोत, आम्ही त्यावर स्वाक्षरी केली आहे. पण सत्तेच्या जोरावर तैवानवर राज्य करणे योग्य नाही.’ गेल्या वर्षी २० जानेवारी रोजी पदभार स्वीकारल्यानंतर बायडेन यांचा हा पहिला आशिया दौरा आहे. युक्रेन हल्ल्याबाबत बायडेन म्हणाले की, रशियाला त्यांच्या क्रूरतेची किंमत दीर्घकाळ चुकवावी लागणार आहे. बायडेन यांनी क्वाड परिषदेच्या आर्थिक हितसंबंधांचा विचार करून इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क (IPEF) तयार करण्याची घोषणा केली. त्यात भारतासह १३ देशांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...