आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑस्ट्रेलिया सरकारने आपल्या नागरिकांना आतापर्यंतच्या सर्वात गंभीर धोक्याबाबत इशारा दिला आहे. येथील ५ तज्ज्ञांच्या समूहाला वाटते की, ऑस्ट्रेलियासमोर सर्वात मोठे आव्हान चीन आहे. या धोक्याची स्थिती संपूर्ण युद्धाच्या रूपात पसरली आहे. केवळ ३ वर्षांच्या आत चीन आपल्याविरुद्ध युद्ध पुकारू शकतो आणि त्यासाठी आपण तयार नाहीत.
ऑस्ट्रेलियातील द सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड आणि द एजने ५ तज्ज्ञांशी चर्चा करून “रेड अलर्ट” शीर्षकाचा हा अहवाल प्रकाशित केला आहे. विदेश धोरणाचे तज्ज्ञ लविना ली म्हणाल्या, चीन प्रादेशिक व्यवस्थेसाठी सर्वात मोठे आव्हान आहे. ज्याचा आपण गेल्या ७० वर्षांपासून सामना केला आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी मुख्य शास्त्रज्ञ एलन फिंकेल चीनकडून जैविक हल्ल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. ते म्हणाले, चीन हल्ल्याच्या तयारीत असेल तर लष्कराची जुळवाजुळव, क्षेपणास्त्र निर्मिती पाहणारच. मात्र, एक जैविक हल्ला झाल्यास काय होईल? तुम्हाला काही दिसणार नाही. भविष्याच्या दृष्टीने आपल्याला जैव सुरक्षा, सायबर सुरक्षेत गुंतवणूक केली पाहिजे. विशेष म्हणजे, कोविड-१९ नंतर चीन आणि ऑस्ट्रेलियातील संबंध बिघडले आहेत. ऑस्ट्रेलिया डब्ल्यूएचओकडून कोविडच्या निष्पक्ष चौकशीची मागणी करणाऱ्या देशांमध्ये आघाडीवर होता. त्याने चीनला जबाबदार ठरवले. यामुळे दोन्ही देशांतील संबंध वाईट झाले आहेत. दरम्यान, चीनच्या आक्रम पवित्र्यानंतर ऑस्ट्रेलिया अमेरिकेकडून ५ अणु पाणबुड्या घेणार आहे. २०२७ पर्यंत अमेरिका काही पाणबुड्या प. ऑस्ट्रेलियात तैनात करेल.
४ मोठी कारणे... ऑस्ट्रेलियन तज्ज्ञ चीनला सर्वात मोठा धोका मानतात िचनी राष्ट्राध्यक्ष युद्धाची तयार करताहेत, ते सैन्याला युद्धासाठी प्रोत्साहन देत आहेत एक हुकूमशहा आपला वारसा स्थापन करू इच्छित असल्याचे आपण युक्रेनमध्ये पाहिले. हा टिपिंग पॉइंट आहे. चिनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंगही नियमितपणे सैनिकांना “युद्ध लढणे आणि जिंकण्यासाठी’ प्रोत्याहन देत आहेत. युद्धाच्या जोखमीचे आपले आकलन राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आक्रमक धोरणावर आधारित आहे.
युक्रेन युद्धामुळे पाश्चिमात्य देश बऱ्याच अंशी दारूगोळामुक्त, याकडे संधी म्हणून पाहतात ऑस्ट्रेलियाचे मुख्य रणनीतिकार राहिलेले पीटर जेनिंग्ज म्हणाले, पाश्चिमात्य देश मोठ्या प्रमाणात दारूगोळामुक्त आहेत. कारण, त्यंानी युक्रेनला व्यापक सहकार्य केले आहे. अशा स्थितीत चीन युद्ध आताच सुरू करू शकतो. तो युक्रेनपासून धडा घेईल. त्यावरून रणनीती आखली जाईल.
कोविडने चीनला वेगळे पाडले, अर्थव्यवस्था संकटात; थयथयाटात करत युद्ध करू शकतो चीन कोविड-१९ मुळे जगात तो वेगळा पडला आहे. त्याची अर्थव्यवस्था वेगाने घसरत आहे. ६० वर्षांत प्रथमच लोकसंख्या घटत आहे. यामुळे त्याचे दोन आकडी आर्थिक विकासाचे दिवस संपू शकतात. अशा स्थितीत कमकुवत चीन विचार करतो की, त्याच्याकडे एक शॉट आहे. या थयथयाटात तो युद्धाचे पाऊल उचलू शकतो.
तैवानशी युद्धाच्या स्थितीत ऑस्ट्रेलिया अमेरिकेस ‘मार्ग’ उपलब्ध करेल, असा चीनला संशय शी जिनपिंग यांचे सर्वात मोठे उद्दिष्ट तैवानवर कब्जा आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले की, अमेरिका तैवानसोबत युद्धात उतरेल. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया अमेरिकेसोबत दिसेल. ऑस्ट्रेलिया, अमेरिकेला तळ व फ्लायझोन देईल, असा अंदाज आहे. चीनला याचा राग आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.