आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या शारीरिक हालचाली चयापचयाच्या (मेटाबॉलिझम) प्रक्रियेवर कसा प्रभाव टाकतात, याबाबत ताज्या अभ्यासात चकित करणारे निष्कर्ष समोर आले आहेत. त्यानुसार, व्यायामाच्या माध्यमातून आपल्याला १०० कॅलरीज खर्चण्याची आशा असते. प्रत्यक्षात यात ७२ पेक्षाही कमी कॅलरीज खर्च होतात.
व्यायामात खर्च कॅलरीजपैकी एक चतुर्थांश कॅलरीजची भरपाई आपले शरीर स्वत:च करून टाकते, असे अभ्यासात स्पष्ट झाले. आपण कितीही घाम गाळला तरी प्रत्यक्षात हे प्रयत्न अपुरेच असतात. लठ्ठ लोकांसाठी व्यायाम हा कॅलरी खर्च करण्याचा रामबाण उपाय ठरत नाही. अभ्यासानुसार, कॅलरी भरपाईचे प्रमाण प्रत्येकात वेगवेगळे असते. यामुळे चयापचय प्रक्रिया व्यायामाला कशी साथ देते हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. वजन घटवण्यात व्यायाम फायदेशीर असल्याचे आजवर आपण ऐकत आलो. जुन्या संशोधनांनुसार, एक मैल चालल्यास १०० कॅलरी खर्च होतात. मात्र, नव्याने व्यायाम सुरू करणाऱ्या बहुतांश लोकांना अपेक्षेपेक्षा कमीच वजन घटवता येते. भलेही डाएटिंग सुरू असले तरी. २०१२ मध्ये दररोज अनेक तास पायपीट करणाऱ्या आफ्रिकेतील शिकाऱ्यांकडे वैज्ञानिकांचे लक्ष गेले. ते पाश्चिमात्य महिला-पुरुषांइतकीच एकूण दैनिक कॅलरीज खर्च करायचे.
संशोधकांना आढळले की, सक्रिय आदिवासींचे शरीर खर्च झालेल्या त्यांच्या पूर्ण कॅलरीजची भरपाई करत होते. यामुळे ते शिकारीचा पाठलाग करताना कुपोषणापासून वाचले. अधिक हालचालींमुळे जास्त कॅलरी खर्च होत नसल्याचा दुजोरा इतर संशोधनांतही मिळाला आहे. लंडनच्या रोहेम्पटन विद्यापीठाचे प्रो. लुइस हॅल्सीनुसार, व्यायामात खर्च कॅलरीच्या २५% पर्यंत भरपाई होते. शरीरात फॅट्सची पातळी जास्त असलेल्यांत कॅलरीच्या भरपाईचीही पातळी अधिक असते. हे त्यांचे शरीर कॅलरीच्या ५०% वा त्याहून जास्तीची भरपाई करून घेते.
शरीर कोणत्या हालचाली कमी करून कॅलरीची भरपाई करते
विशेेष म्हणजे, या अभ्यासादरम्यान लोक किती जेवण करतात, हे पाहण्यात आले नव्हते. हा अभ्यास फक्त ऊर्जेवर केंद्रित होता. जसे की, शरीर आतल्या आत कशा जैविक हालचाली घटवून व्यायामात खर्च कॅलरीजची भरपाई करते. डॉ. हॅल्सी यांच्यानुसार, आपण नकळत ही भरपाई कशी करून घेतो आणि कोणत्या अंतर्गत प्रणाली सर्वात अधिक प्रभावित होऊ शकतात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.