आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • What Is Putin's 'laser Weapon' That Blinds Soldiers, Find Out How To Destroy A Drone In 5 Seconds, Latest News And Update

दिव्य मराठी एक्सप्लेनर:काय आहे सैनिकांना अंध बनवणारे पुतीनचे 'लेझरास्त्र', जाणून घ्या 5 सेकंदांत ड्रोनला कसे करते भस्म

नीरज सिंहएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

'स्टार वॉर्स' सारख्या अनेक सायंस फिक्शन चित्रपटांत तुम्ही ड्रोन व क्षेपणास्त्रांचा पाडाव करणारे लेझर शस्त्र पाहिले असेल. पण, आता ही केवळ कल्पना राहिली नाही. रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन युद्धात या शस्त्राचा प्रत्यक्ष वापर सुरू केला आहे. रशियाने युक्रेनमध्ये अनेक ड्रोन व क्षेपणास्त्रांना आपल्या लेझर शस्त्रांनी भस्म केल्याचा दावा केला आहे. तज्ज्ञांच्या मते, "या शस्त्रामुळे सैनिकांना अंधत्वही येऊ शकते."

युक्रेनला आतापर्यंत अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांकडून मिळालेल्या ड्रोनच्या माध्यमातून रशियन सैनिकांना थोपवण्यात यश मिळाले आहे. यामुळे रशियाने आपल्या पुढच्या पीढीच्या शस्त्रास्त्रांना मैदानात उतरवण्यास सुरूवात केली आहे.

त्यामुळे चला जाणून घेऊया लेझर शस्त्र कसे असतात? ते काम कसे करतात? जगातील किती देशांकडे अशी शस्त्रे आहेत? व ते कोणत्या प्रकारच्या शस्त्रांना भस्म करतात? या प्रश्नांची उत्तरे...

रशिया युक्रेनमध्ये कोणत्या लेझर शस्त्रांचा वापर करत आहे?

सध्या व्यापक इलेक्ट्रोमॅग्नेटिक बँडचा वापर करणारे नवे लेझर शस्त्र आता पारंपरिक शस्त्रांची जागा घेत आहेत. रशियानेही युक्रेन युद्धात नव्या शस्त्रांचा वापर केल्याचा दावा केला आहे. आमच्या लेझर शस्त्रांनी युक्रेनच्या अनेक ड्रोनला भस्मसात केल्याचा दावा रशियाने केला आहे.

अमेरिकेसह सर्वच पाश्चिमात्य देश युक्रेनच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले असताना रशियाने हा दावा केला आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी 2018 मध्ये सर्वप्रथम 'पेरेस्वेट' नामक लेझर शस्त्राचा उल्लेख केला होता. हे नाव मध्ययुगीन ऑर्थोडॉक्स योद्धा मोंक एलेक्झांडर पेरेस्वेटच्या नावाने ठेवण्यात आले होते. 'पेरेस्वेट'चा एका युद्धात मृत्यू झाला होता.

रशियाचे उप पंतप्रधान व लष्करी विकासाचे प्रभारी युरी बोरिसोव्ह यांनी मॉस्कोत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, 'पेरेस्वेट' मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेत. हे शस्त्र पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 1500 किमी उंचीवरील उपग्रहांना क्षणार्धात अंध बनवू शकते.

रशियाने युक्रेनमध्ये आपले नवे व अधिक ताकदवान लेझर शस्त्र 'जदिरा' तैनात केले आहे. बोरिसोव्ह यांनी सांगितले की, मेच्या प्रारंभी जदिराची चाचणी करण्यात आली होती. 'पेरेस्वेट' उपग्रहांना आंधळे बनवते, तर 'जदिरा' ड्रोन व क्षेपणास्त्रांना भस्मसात करते.

यावेळी त्यांना या शस्त्रांचा युक्रेनमध्ये वापर केला जात आहे का?, असा थेट प्रश्न विचारला असता त्यांनी 'जदिरा'च्या पहिल्या प्रोटोटाइपचा युक्रेनमध्ये वापर होत असल्याचे स्पष्ट केले. हे लेझर हत्यार इन्फ्रारेड लाइट बीम म्हणजे किरणे पाठवून आपल्या टार्गेटला ते भस्मसात होईपर्यंत उष्ण करते.

रशियाचे लेझर हत्यार किती धोकादायक?

रशियन माध्यमांनी 2017 मध्ये 'जदिरा'विषयी म्हटले होते की, न्यूक्लियर कॉर्पोरेशन रोसातोमने हे शस्त्र तयार करण्यात मदत केली होती. हे भौतिकशास्त्राच्या नवीन तत्त्वांवर आधारित शस्त्रे बनवण्याच्या कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आले आहे. 'जदीरा' 5 किमी अंतरावरील ड्रोन व क्षेपणास्त्रांना अवघ्या 5 सेकंदांत भस्मसात करण्यात माहीर आहे. तर 'पेरेस्वेट' पृथ्वीपासून 1500 किमी उंचीवरील उपग्रहांना आंधळे बनवण्यात सक्षम आहे.

उपग्रहांच्या माध्यमातून अण्वस्त्रवहनक्षम आंतरखंडीय क्षेपणास्त्रावर नजर ठेवली जाते. त्यामुळे 'पेरेस्वेट' अत्यंत महत्वपूर्ण आहे. ही यंत्रणा फायटर जेटच्या वैमानिकालाही आंधळे बनवू शकते.

ऑस्ट्रेलियन लष्कराचे सेवानिवृत्त मेजर जनरल म्हणाले -जदिरा सारखे लेझर शस्त्र ड्रोनसह युक्रेनचा संपूर्ण तोफखाना उद्ध्वस्त करु शकतात. युक्रेनी सैनिकांना आंधळे बनवू शकतात. आंतरराष्ट्रीय करारांतर्गत अशा शस्त्रांवर बंदी आहे.

काही लष्करी तज्ज्ञांच्या मते, ड्रोनविरोधात लेझर शस्त्र अत्यंत परिणामकारक ठरू शकतात. हे किती प्रभावी ठरतात हे सर्वस्वी हवामानावर अवलंबून असते. म्हणजे चांगल्या वातावरणात ते पूर्ण क्षमतेने काम करतात. तर धुके, पाऊस व हिवाळ्यात लेझर बीम आपल्या टार्गेटवरुन भरकटू शकतात. अनेक तज्ज्ञ या शस्त्रांच्या परिणामकारकतेवरही सवाल उपस्थित करत आहेत. त्यांच्या मते, लेझर शस्त्र एकाचवेळी एकाच ठिकाणी हल्ला करु शकतात. क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा त्यांच्याहून अधिक प्रभावी आहे. ती एकाचवेळी अने लक्षांना उद्ध्वस्त करु शकते.

भारत, अमेरिका, चीन व इस्त्रायलकडे लेझर शस्त्र आहेत?

भारत -2021 च्या प्रारंभी डीआरडीओच्या लेझर वेपन 'डायरेक्शनली अनरिस्ट्रिक्टेड रे गन अरे' म्हणजे दुर्गा -2 च्या निर्मिती बातमी उजेडात आली होती. या लेझर गनचा वापर लष्कराच्या तिन्ही अंगांना करता येईल.

अमेरिका -अमेरिकन नौदलाने 2014 मध्ये सर्वप्रथम लॉज नामक लेझर अस्त्र तयार केले होते. ते यूएसएस पेंसवर तैनात करण्यात आले होते. सध्या जनरल अटॉमिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिस्टम व बोइंग संयुक्तपणे अमेरिकेच्या सर्वात ताकदवान लेझर शस्त्राची निर्मिती करत आहेत. हे शस्त्र 300 किलोवॅटचे असेल. ते कोणतेही ड्रोन, क्षेपणास्त्र व फायटर जेटला क्षणार्धात भस्मसात करु शकते.

इस्त्रायल -इस्त्रायलने गत एप्रिल महिन्यातच लेझर क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली होती. आयरन बीम असे या प्रणालीचे नाव आहे. आयरन बीमने ड्रोन, मोर्टार, रॉकेट व अँटी टँक क्षेपणास्त्रांना एकाच हल्ल्यात उद्ध्वस्त केले होते. इस्त्रायलचे पंतप्रधान नेफ्ताली बेनेट यांनी याविषयी बोलताना या प्रणालीच्या एका हल्ल्यासाठी अवघा 267 रुपयांचा खर्च येत असल्याचे स्पष्ट केले होते.

चीन -चीननेही यंदाच आपल्या जे-20 फायटर जेलटा लेझर शस्त्रांनी सूसज्ज करण्याची घोषणा केली आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष रशियाच्या लेझर शस्त्रांची थट्टा का उडवत आहेत?

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यानी लेझर शस्त्रांची तुलना दुसऱ्या महायुद्धातील नाझींच्या वंडर वेपनशी करत त्यांची टर उडवली आहे. 'लेझर शस्त्राच्या चर्चेवरुन रशियाला या युद्धापासून काहीच मिळणार नसल्याचे स्पष्ट होते. पूर्ण ताकदीने लढल्या जाणाऱ्या या युद्धाच्या तिसऱ्या महिन्यात रशिया आपले वंडर वेपन शोधताना दिसून येत आहे. यावरुन त्याची मोहीम अपयशी ठरल्याचे सिद्ध होते,' असे ते म्हणालेत.

बातम्या आणखी आहेत...