आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मलाला म्हणते : कधी काळी जे सोसलं, तेच आता अफगाणिस्तानातील मुलींच्या वाट्याला येतंय...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन दशकांत अफगाणिस्तानात लाखो मुली व महिला शिक्षित झाल्या. मात्र ज्या उज्ज्वल भविष्याचे त्यांना आश्वासन दिले होते, आता त्यावरच गंडांतर आले आहे. मुलींना शाळा-कॉलेजांत जाण्यापासून रोखणाऱ्या तालिबानींच्याच हातात देश पुन्हा गेला आहे. माझ्या मनातही अफगाणी भगिनींबाबत चिंता दाटली आहे. मदत करता न येण्याची हतबलताही आहे. माझ्या मनात बालपणाच्या आठवणी पुन्हा जाग्या होत आहेत. २००७ मध्ये तालिबानने पाकिस्तानात माझ्या शहरावर कब्जा करून मुलींचे शिक्षण रोखले होते. मी शालीखाली पुस्तके लपवून घाबरतच शाळेत जायचे. शिक्षण हक्कावर बोलले तर मला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला.

ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी करिअरच्या वाटा धुंडाळत आहे. हे सर्व गमावण्याची मी कल्पनाही करू शकत नाही. कधी काळी मी जे भोगले, तेच सावट आता अफगाणी मुलींवर आहे. जेथे बंदूकधारी पुरुष जगणे ठरवतील, त्या आयुष्यात परतण्याची मी कल्पनाही करू शकत नाही. आम्ही मुलींचे शिक्षण व काम करण्याचा अधिकार हिरावून घेणार नाही, असे तालिबानने म्हटले आहे. पण स्त्री हक्कांबाबत तालिबानचा दमनकारी इतिहास पाहता महिलांचे भय वाजवी आहे. अफगाणींसाठी काहीच बदललेले नाही. ते अनेक वर्षांपासून निर्वासित छावण्यांत आहेत. कलाश्निकोव तालिबानच्या हातात असली तरी त्याचे ओझे अफगाणी नागरिकांवर आहे. ज्या देशांनी अफगाणींना मोहरे म्हणून वापरले, ते आता त्यांना स्वबळावर लढण्यासाठी सोडून गेले. अफगाणी महिला व मुलींच्या मदतीस आजही उशीर झालेला नाही.

तालिबानी कोणत्या गोष्टींना परवानगी देतील ते स्पष्ट करावे, अशी अफगाणींची इच्छा आहे. मुली शाळेत जाऊ शकतील इतकेच म्हणणे पुरेसे नाही. मुली शिक्षण पूर्ण करू शकतील, विज्ञान-गणित शिकू शकतील, विद्यापीठात जाऊ शकतील, पसंतीची नोकरी करू शकतील, असे समझोते करण्याची गरज आहे. तालिबानचा भर फक्त धार्मिक शिक्षणावर असेल, अशी शंका आहे. ते मुलांना त्यांच्या पसंतीचे शिक्षण घेण्यापासून रोखतील. त्यामुळे या देशात डॉक्टर, इंजिनिअर व वैज्ञानिक तयार होणार नाहीत. या कठीण समयी आपल्याला अफगाणी महिला व मुलींची आर्त हाक ऐकावीच लागेल....

बातम्या आणखी आहेत...