आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअ‍ॅपवर मोठी कारवाई:आयर्लंडने मेसेजिंग अ‍ॅपवर 1971 कोटींचा ठोठावला दंड, वापरकर्त्यांच्या डेटा गोपनीयतेमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॉट्सअ‍ॅपवर आयर्लंडमध्ये मोठी कारवाई झाली आहे. आयर्लंड सरकारने वापरकर्त्यांच्या गोपनीयता धोरणात पारदर्शकता न बाळगल्याबद्दल कंपनीला 1971 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर वापरकर्त्यांच्या डेटा गोपनीयतेचे उल्लंघन आणि इतर फेसबूक प्लॅटफॉर्मवर वैयक्तिक डेटा शेअर करण्याविषयी माहिती लपवल्याचा आरोप होता.

आयर्लंडचे डेटा प्रायव्हसी कमिशनर (डीपीसी) म्हणाले की व्हॉट्सअ‍ॅप इतर फेसबुक प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांचा डेटा कसा शेअर करतो हे उघड करत नाही. व्हॉट्सअ‍ॅपने वापरकर्त्यांना अंधारात ठेवले. या प्रकरणात, कंपनीने युरोपियन युनियनच्या डेटा गोपनीयतेच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.

कोणत्या नियमानुसार आकारण्यात आला दंड
युरोपियन युनियनच्या जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (जीडीपीआर) अंतर्गत कंपनीवर ही कारवाई करण्यात आली आहे. जीडीपीआर 2018 मध्ये जगातील सर्वात व्यापक डेटा गोपनीयता कायदा म्हणून लागू करण्यात आला. 3 वर्ष जुन्या नियमानुसार मोठी कारवाई न झाल्याने या नियमावर बऱ्याच काळापासून टीका होत होती.

युरोपमधील डेटा गोपनीयता कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी 265 पानांचा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. निर्णयात व्हॉट्सअॅपला त्याचे गोपनीयता धोरण सुधारण्यास सांगितले आहे.

या नियमानुसार, कंपन्या युरोपच्या त्याच देशांद्वारे नियंत्रित केल्या जातील जिथे त्यांचे मुख्यालय आहे. फेसबुक, गुगल, ट्विटर, अ‍ॅपल आणि इतर अनेक कंपन्यांचे मुख्यालय युरोपमध्ये आयर्लंडमध्ये आहे. कारण आयर्लंडमध्ये कॉर्पोरेट कर दर कमी आहेत, ज्यामुळे कंपन्यांना फायदा होतो.

व्हॉट्सअ‍ॅपने केले स्पष्ट
व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की ते या प्रकरणावर आणखी अपील करेल. कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की अ‍ॅप पूर्णपणे सुरक्षित आहे आणि आम्ही वापरकर्त्यांच्या डेटाचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही हा दंड स्वीकारत नाही.

बातम्या आणखी आहेत...