आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • When To Return Home? ... Sandhu Said, "Just Stay!" Ambassador Sandhu Told Problems To 500 Indian Students In The US

वॉशिंग्टन:मायदेशी कधी परतायचे ?... संधू म्हणाले, तूर्त मुक्कामच चांगला! अमेरिकेत 500 भारतीय विद्यार्थ्यांना राजदूत संधू यांनी सांगितल्या अडचणी

वॉशिंग्टन3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत सुमारे 2.5 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात

अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी कोरोना विषाणूच्या संकटामुळे विद्यापीठ अचानक बंद केल्यामुळे आणि लॉकडाऊनमुळे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आहे तिथेच थांबण्याचा सल्ला दिला आहे. तसेच या संकटाच्या स्थितीत मदतीचे आश्वासन दिले आहे. संधू यांनी भारतीय दूतावासातर्फे आयोजित इन्स्टाग्राम लाइव्ह सत्रात सहभागी सुमारे ५०० भारतीय विद्यार्थ्यांना ऐकले. या सत्राचे आयोजन इंडिया स्टुडंट हब टीमने केले होते. अमेरिकेत सुमारे २५०००० भारतीय विद्यार्थी आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी विद्यापीठ बंद झाल्यामुळे वसतीगृह सोडण्यास सांगितल्यामुळे तेथे अडकले आहे. देशात महामारी फैलाव रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी घरातच राहण्याच्या दिलेल्या आदेशाचे त्यांना पालन करावे लागत आहे. 

  • इन्स्टाग्राम सेशनमध्ये ५०० विद्यार्थी होते, म्हणाले- कुटंब चिंतेत

विस्कॉन्सिन विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणाले- होस्टेल सोडण्यास सांगण्यात येत आहे

इन्स्टाग्राम सत्रात सहभागी भारतवंशीय ५०० विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न होता, आम्ही देशात कधी परतणार? विस्कॉन्सिनचे अदिती आणि सुश्रूत यांनी विचारले की आम्हाला विद्यापीठ सोडण्यास सांगितले तर आम्ही काय करणार. यावर संधू म्हणाले, कुठलिही समस्या असल्यास भारतीय दूतावासाशी संपर्क साधू शकतात. तसेच ज्या नियमांचे पालन करण्यास सांगितले जात आहे, त्याचे पालन करावे. विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा करा. तुम्हा ठणठणीत असल्याचे त्यांना पट‌वून द्या. ते लोक ही तणावात आहेत. त्यांना सहकार्य करा.

निम्म्याहून जास्त विद्यार्थ्यांचे व्हिसाविषयी प्रश्न, संधू- स्थिती सुधारल्यानंतर योजना करा 

दोन विद्यार्थ्यांनी विचारले की, त्यांना व्हिसा कधीपर्यंत मिळेल. यावर संधू म्हणाले, सध्या १८ तासांचा प्रवास करण्यासारखी स्थिती नाही. धैर्य ठेवा. अभ्यास करा. रिकाम्या वेळेत देशाची संस्कृती, येथील चित्रपटांचे कौतुक करा. येथील आरोग्य सुविधा उत्तम आहेत. यामुळे येथेच थांबणे योग्य राहील. भारतीय दूतावास विद्यार्थ्यांच्या व्हिसाबाबत अमेरिकी सरकारच्या संपर्कात आहे. स्थिती सुधारल्यानंतर विचार करू. 

  • उपचाराचे संभाव्य औषध हायड्रोक्लोरोक्वीनचे पहिली खेप अमेरिकेत दाखल
  • भारतातून हायड्रोक्सीक्लोरोक्वीन ची पहिली खेप शनिवारी अमेरिकेत पोहोचली, त्यास संभाव्य औषध म्हटले जाते.
  • संयुक्त अरब अमीरात ने सांगितले, येथे अडकलेल्या भारतीयांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास, त्यांना भारतात पाठवण्यात येईल.
  • भारतातून नेपाळला गेलेले व बीरगंजच्या मशीदीत राहिलेल्या तीन भारतीयांना कोरोनाची लागण.
बातम्या आणखी आहेत...