आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Where There Is So Much Diversity And Heterogeneity In The Population, Only 8% Of People Can Become Infected Even If They Have Herd Immunity.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संशोधन:जेथे लोकसंख्येत खूप विविधता आणि विषमता, तेथे फक्त 8% लोक संक्रमित झाले तरीही येऊ शकते हर्ड इम्युनिटी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारत वैविध्यतेने नटलेला देश, त्यामुळे आपल्यासाठी ही दिलासादायक बातमी ठरू शकते

जर्मनीच्या मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी एका वेगळ्या मॉडेलद्वारे हर्ड इम्युनिटीचे अनुमान व्यक्त केले आहे. त्यानुसार कमी संख्येने लोक संक्रमित झाले तरी हर्ड इम्युनिटी विकसित होऊ शकते. त्यामुळे भारतातील वैविध्यतेचा एक आणखी मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो. कोरोनाबाबत मानले जाते की, लोकसंख्येचा मोठा हिस्सा संक्रमित होईल तेव्हा हर्ड इम्युनिटी विकसित होईल आणि महामारी संपेल. लोकसंख्येत सर्व लोक एकसारखे असतात या मान्यतेवर आधारित हा अंदाज आहे. पण प्रत्यक्षात तसे नसते. कुठल्याही ठिकाणच्या लोकसंख्येत राहणीमान, शिक्षण, वंश, रोगप्रतिबंधक क्षमता, जागरूकता, आर्थिक स्तर असे वैविध्य असते. असे वैविध्य भारतीय समाजात खूपच जास्त आहे, त्याचा फायदा कोरोनाशी लढण्यास होऊ शकतो. बहुतांश संसर्गात असे दिसते की, खूप मोठी लोकसंख्या संक्रमित होण्याआधीच आजार संपतो, पण त्याचे कारण समजू शकले नव्हते. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटच्या शोधानुसार, ज्या ठिकाणी लोकसंख्येत विषमता आणि वैविध्य असेल तेथील लोक सर्वात आधी आणि वेगाने संक्रमित होतील, तेथे संक्रमण वेगाने महामारीचे रूप घेईल, पण तेवढ्याच वेगाने लोक रोगमुक्त होतील. त्यामुळे इतर असंक्रमित लोकसंख्येत हर्ड इम्युनिटी येऊ लागेल.

वेगवेगळ्या लोकसंख्येत हर्ड इम्युनिटी

जेव्हा महामारी सुरू झाली तेव्हा सर्व प्रकारच्या लोकसंख्येत एका संक्रमित व्यक्तीपासून २.५ लोकांना संसर्ग होण्याची शक्यता होती. संशोधनात एका आलेखाच्या माध्यमातून दाखवले गेले आहे की, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकसंख्येत परिणाम असा असेल, अशा तीन स्थितींद्वारे पाहू-

> लोकसंख्येत समानता असेल तर हर्ड इम्युनिटी ६० % लोक संक्रमित झाल्यावर येऊ शकते. ५० लाखांच्या लोकसंख्येत ३० लाखांना संसर्ग झाल्यावर हर्ड इम्युनिटी येईल.

> लोकसंख्येत सामान्य वैविध्य असेल, तर हर्ड इम्युनिटी ३७% लोक संक्रमित आल्यावर येईल. लोकसंख्या ४०.५ लाख असेल तर १५ लाख लोक संक्रमित झाल्यावर हर्ड इम्युनिटी.

> लोकसंख्येत खूप वैविध्य असेल, तर ८% लोकसंख्या संक्रमित झाल्यावर इम्युनिटी शक्य. लोकसंख्या ३१.२ लाख असेल तर २५ हजार संक्रमित झाल्यावर हर्ड इम्युनिटी येईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser