आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Whether Or Not The Body Has Developed Immunity, Will Now Be Understood From The T cells In The Blood In Twenty four Hours

संशोधन:शरीरात इम्युनिटी विकसित झाली की नाही, आता चाेवीस तासांत रक्तातील टी-सेलवरून समजणार

अमेरिका17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील संशाेधकांपैकी एका गटाने अलीकडे शरीरात हर्ड इम्युनिटी (सामूहिक राेगप्रतिकारक क्षमता) आहे की नाही, हे सांगणारे किट तयार केले आहे. रक्त नमुन्यांच्या मदतीने शरीरात अस्तित्वात असलेल्या टी-सेलच्या (पांढऱ्या रक्तपेशी) तपासणीतून इम्युनिटी स्पष्ट हाेणार आहे. नेचर बायाेटेक्नाॅलाॅजीमध्ये प्रकाशित या अध्ययनानुसार ही तपासणी केल्याच्या चाेवीस तासांहून कमी वेळेत काेराेना संसर्गानंतर तुमच्यात किती प्रमाणात राेगप्रतिकारशक्ती विकसित झाली? तुम्हाला लस घेण्याची गरज आहे का? लस घेतल्यानंतर विषाणूशी लढण्यासाठी तुमच्या शरीरात पुरेशी शक्ती निर्माण झाली किंवा नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासणीनंतर मिळतील. या किटच्या आधारे लसीकरण माेहीम राबवली जाऊ शकेल. इम्युनिटी तपासणीसाठी टी-सेल टेस्ट संपूर्णपणे नवे नाही. अमेरिकेतील फूड अँड ड्रग प्रशासनाने गेल्या वर्षी टी-सेल परीक्षणाला आणीबाणीच्या स्थितीत वापराला परवानगी दिली हाेती. माउंट सिनाईमध्ये न्यूयाॅर्क शहरातील टिश कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये आॅन्काॅलाॅजिकल विज्ञानाचे प्राेफेसर संशाेधक अर्नेस्टाे गुचिआेन म्हणाले, काेराेनातून बाहेर पडलेल्या प्रत्येक रुग्णात अँटिबाॅडी विकसित हाेत नाहीत. अँटिबाॅडी विकसित झाली तरी ती आठ आठवड्यांपेक्षा जास्त नसते. परंतु टी-सेल्सची स्मरणशक्ती अनेक वर्षे राहते.

इम्युनिटी का तयार झाली नाही, कारण टी-सेल सांगणार

बातम्या आणखी आहेत...