आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • WHO Coronavirus News | World Health Organization Coronavirus Alert Over COVID 19 Outbreak Second Wave Latest Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाची दुसरी लाट:जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा- कोरोनाची दुसरी लाट येत आहे, रुग्णांची संख्या कमी होतीये असे गृहित धरू नका

दिव्य मराठीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रकरणे कमी होत असलेल्या देशांना दुसऱ्या लाटेचा धोका - डब्ल्यूएचओचे डॉ.माइक रेयान यांचा इशारा
  • रेयान म्हणाले - साथीचे रोग लाटेच्या स्वरूपात येतात, कोरोनाची दुसरी लाट देखील येऊ शकते.

कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी होत असलेल्या देशांना जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओच्या मते, कोरोनाची प्रकरणे कमी होत असलेल्या देशांत अचानक ती वाढू शकतात. यामुळे फक्त पाहत न बसता सरकारांनी महामारी रोखण्याच्या उपाययोजनांसोबत तयार राहावे. 

डब्ल्यूएचओचे आणबाणी प्रमुख डॉ. माइक रेयान म्हटले की, "संपूर्ण जग कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेशी झुंज देत आहे. अनेक देशांत रुग्णसंख्येत घट होत आहे. मध्य आणि दक्षिण अमेरिका, दक्षिण आशिया आणि आफ्रिकते रुग्णसंख्या वाढत आहे."

संक्रमणाची दुसरी लाट तीव्र असू शकते

रेयान म्हटले की, "साथीचे रोग लाटेच्या स्वरुपात येतात. यामुळे ज्या भागांत प्रकरणे कमी झाली, त्या क्षेत्रात ही लाट पुन्हा येऊ शकते. सध्या सुरू असलेल्या संसर्गाची पहिली फेरी थांबविली गेली तरी पुढच्या वेळी संसर्गाचे प्रमाण खूप वेगवान असू शकते."

रुग्णांची संख्या कमी होतीये असे गृहित धरू नका

डॉक्टर रेयानच्या मते, "कोरोना पुन्हा येऊ शकतो हे समजून घेणे आवश्यक आहे. आकडेवारी कमी होत असल्याने संकट कमी होत आहे असे गृहित धरू नका. कोरोनाची दुसरी लाट देखील येऊ शकते."

युरोपियन देश आणि अमेरिकेलाही दिला इशारा 

रेयान म्हणाले की, "युरोप आणि उत्तर अमेरिकेने बचावासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे. स्वत: ला दुसर्‍या फेरीपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी सतत तपासणीसह संरक्षण धोरण ठेवण्याची आवश्यकता आहे. अनेक युरोपियन देश अमेरिकी राज्यांनी लॉकडाउनसह त्या उपायांकडे पाठ फिरवली जे संक्रमण रोखू शकतात. यामुळे अर्थव्यवस्था देखील स्थिर ठेवू शकतात."

बातम्या आणखी आहेत...