आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेने शस्त्र विक्रेता व्हिक्टर बाऊटला सोडले:‘मौत का सौदागर’ व्हिक्टर बाऊट कोण?

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाने बास्केटबॉल स्टार ब्रिटनी ग्रिनरची तुरुंगातून सुटका केली आहे. त्याच्या बदल्यात अमेरिकेने शस्त्र विक्रेता व्हिक्टर बाऊटला सोडले आहे. व्हिक्टरला २००८ मध्ये यूएस ड्रग एनफोर्समेंट एजन्सीने थायलंडमधून अटक केले होते. त्यावेळी त्याने साथीदारला सांगितले होते,मला वाटते खेळ संपला.

{व्हिक्टरचा इतिहास काय, गुन्हेगार कसा झाला? व्हिक्टर बाऊट १९६७ मध्ये दुशांबेत जन्मला. तेव्हा ती सोव्हियत ताझिकिस्तानची राजधानी होती. तो सोव्हियत लष्करात भाषांतराचे काम करत होता. व्हिक्टरला अनेक भाषा येतात. १९९१ मध्ये त्याने लष्कर सोडून आयात-निर्यात व्यवसाय सुरू केला. १९९४ मध्ये त्याने शस्त्र पुरवठाही सुरू केला. येथून त्याचा गुन्हेगारीत आला.

{अमेरिकेच्या हाती कसा लागला व्हिक्टर बाऊट? सन २००२ मध्ये यूएनद्वारे जारी एका अहवालात नमूद केले की, व्हिक्टरने ३० पेक्षा जास्त जहाजांच्या मदतीने जगभरातील अनेक देशांत शस्त्रे पोहोचवली आहेत. २००२ ते २००७ दरम्यान तो ज्या देशांत राहिला, तेथे रक्तपात झाला. २००८ मध्ये इंटरपोलला माहिती मिळाली की, व्हिक्टर बँकॉकमध्ये आहे. तो येथे अमेरिकी एजंटांना शस्त्र विकण्यास आला आणि पकडला गेला. ही शस्त्रे अमेरिकी लष्कराविरुद्ध वापरली जाणारी होती.

{अदला-बदली प्रक्रियेतून कसा सुटला व्हिक्टर? बास्केटबॉल खेळाडू ब्रिटनी ग्रिनर मॉस्कोत खेळण्यासाठी आली होती. यादरम्यान तिच्या बॅगमध्ये भांगेचे तेल आढळून आले. त्यामुळे तिला अटक करण्यात आले. ब्रिटनीच्या सुटकेच्या बदल्यात अमेरिकेने व्हिक्टरला सोडण्याची ऑफर दिली. ती रशियाकडून मान्य करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...