आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सर्व देशांना कोरोनाशी संबंधीत माहिती शेअर करण्यास सांगितले आहे. अमेरिकेच्या दाव्यानंतर WHO प्रमुखांचे विधान समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच FBI संचालक क्रिस्टोफर रे म्हणाले होते की, चीनच्या वुहान लॅबमधूनच कोरोना लीक झाला आहे. चीनने एफबीआयचा दावा फेटाळला.
त्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख टेड्रोस अदनोम गेब्रेयसस म्हणाले- अमेरिकेने दाव्याशी संबंधित कोणताही अहवाल सादर केलेला नाही. अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांनीही गुप्तचर अहवालाचा हवाला देत चीनवर आरोप केले होते. परंतू आमच्याकडे अशा कोणत्याही प्रकारचा अहवाल आलेला नाही.
कोरोना उत्पत्तीचा अहवाल भविष्यात ठरेल उपयुक्त
कोणत्याही देशाकडे कोरोनाच्या उत्पत्तीशी संबंधित काही माहिती असल्यास त्यांनी ती आम्हाला द्यावी. आम्हाला फक्त हे जाणून घ्यायचे आहे की, महामारी कशी आणि कुठे सुरू झाली. आम्हाला काही ठोस माहिती मिळाल्यास, आम्ही आगामी काळात येणारी महामारी टाळण्याचे मार्ग शोधू शकतो. तसेच पुढील समस्यांना सामोरे जाणे अगदी सोपे होईल.
यापूर्वीही चीनवर आरोप, सरकारने फेटाळून लावले होते
वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (डब्ल्यूआयव्ही) मधून सुरक्षेतील त्रुटींमुळे हा विषाणू लिक झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. यानंतर अवघ्या काही दिवसांतच तो जगभर पसरला. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून, वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरची गळती होण्याचे अनेक सिद्धांत मांडले गेले होते. काम करणारे संशोधक विशेषतः कोरोना विषाणूच्या प्रजातींचा अभ्यास करतात. अशा परिस्थितीत शास्त्रज्ञाच्या माध्यमातून त्याचा संसर्ग पसरण्याची शक्यता वर्तविली गेली. दरम्यान, चीन सरकार आणि वुहान लॅबने नेहमीच हे आरोप फेटाळून लावले आहेत.
अमेरिकेवरही व्हायरस पसरवल्याचा आरोप
तीन महिन्यांपूर्वी, एका अमेरिकन शास्त्रज्ञाने असा दावा केला होता की, अमेरिकन सरकार चीनमध्ये कोरोना विषाणू तयार करण्यासाठी एका प्रकल्पासाठी निधी देत आहे. शास्त्रज्ञ अँड्र्यू हफ यांनी सांगितले की, कोरोना विषाणूवर करण्यात येत असलेल्या संशोधनाला अमेरिकेची वैद्यकीय संशोधन संस्था नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ (NIH) ने पाठिंबा दिला आहे. त्यांनीच चीनला व्हायरस बनवण्याचे तंत्रज्ञान दिले. ते बायोवेपन तंत्रज्ञानापेक्षा कमी नव्हते.
चीनला पहिल्या दिवसापासूनच माहित होते
अँड्र्यू हफ म्हणतात की, चीनला पहिल्या दिवसापासूनच माहित होते की, कोरोना हा नैसर्गिक विषाणू नसून तो अनुवांशिकरित्या बदललेला आहे. त्यामुळे लॅबमधून ते लीक झाले. असे असूनही, सुरक्षा आणि चेतावणीबाबच लोकांना सांगितले गेले नाही. चीनने या रोगाच्या प्रादुर्भावाबद्दल खोटे सांगितलेच त्याहून धक्कादायक बाब म्हणजे कोरोना नैसर्गिक व्हायरस आहे, हे दाखविण्यासाठी सर्वोतेपरी प्रयत्न केले.
2021 ला प्रथमच गळतीची शक्यता, अहवालात स्पष्ट
2019 मध्ये कोरोना महामारीची सुरूवात झाली. परंतु व्हायरसच्या उत्पत्तीचा तपास जानेवारी 2021 मध्ये सुरू झाला. 17 आंतरराष्ट्रीय तज्ञ आणि 17 चीनी तज्ञ चीनच्या वुहान येथे पोहोचले. वुहानमध्ये तपास पूर्ण होण्यापूर्वी, स्वतंत्र तपास पथकाचे सदस्य पीटर बेन इम्बारेक यांनी पत्रकार परिषद घेतली आणि विषाणूच्या उत्पत्तीचे संभाव्य मार्ग सार्वजनिक केले.
हे ही वाचा
दिव्य मराठी विशेष सजीवही नाही आणि निर्जीवही नाही:कोरोना विषाणू अमर आहेत का? व्हायरसचे नेमके वय किती असते?
कोरोना काळ आपण सर्वांनीच अनुभवला आहे. सध्या हीच स्थिती चीनमध्ये पाहायला मिळतेय. चीनमध्ये कोरोनाची लाट आली आहे. येत्या काही महिन्यात चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक रुग्ण संख्येचा आकडा पार करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने देखील बैठक घेत, सर्व राज्यांना सतर्क राण्याचा इशारा दिला आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी
वुहान लॅबमधून लीक झाला कोरोना:शास्त्रज्ञाचा दावा; म्हणाला- अमेरिकेने चीनला व्हायरस तयार करण्याचा प्रोजेक्ट दिला
जगभरातील कोट्यवधी लोकांचे बळी घेणारा कोरोना व्हायरल चीनच्या वादग्रस्त वुहान लॅबमध्ये तयार करण्यात आला होता. तथापि, हा व्हायरस तयार करण्याच्या प्रकल्पाला खुद्द अमेरिकन सरकार आर्थिक रसद पुरवत होते, असा खळबळजनक दावा अमेरिकन संशोधक अँड्र्यू हफ यांनी आपल्या द ट्रुथ अबाउट वुहान' नामक पुस्तकात केला आहे. हफ यांनी स्वतः या लॅबमध्ये काम केले आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.