आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महामारी:डब्ल्यूएचओने कोरोना उपचारात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचे ट्रायल थांबवले, औषधाचे दुष्परिणाम पाहता निर्णय

जिनेव्हाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ने कोरोना उपचारात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचे ट्रायल सध्या थांबवले आहे. या औषधाचे दुष्परिणाम पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. डब्ल्यूएचओचे चीफ टेड्रॉस गेब्रयेसस यांच्यानुसार मेडिकल जर्नल लॅन्सेटच्या एका स्टडीमध्ये मागील आठवड्यात सांगण्यात आले होते की, कोरोना रुग्णांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन दिल्याने त्यांच्या जीवाचा धोका वाढू शकतो.

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन व्यतिरिक्त इतर ट्रायल सुरु

गेब्रयेसस यांनी सोमवारी सांगितले की, ट्रायलमध्ये सहभागी जगभरातील शेकडो रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन देणे बंद केले आहे. या व्यतिरिक्त इतर ट्रायल सुरु आहेत. डेटा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्ड आकड्यांची समीक्षा करत आहे.

बातम्या आणखी आहेत...