आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना संकट:डब्ल्यूएचओचा सल्ला-'निर्बंध हटवणाऱ्या देशांनी जास्त सावध राहण्याची गरज, एका चुकीमुळे संक्रमण परत पसरु शकते'

जेनेवाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डब्ल्यूएचओचे संचालक डॉ. टेड्रॉस गेब्रयेसस म्हणाले- व्हॅक्सीन तयार होईपर्यंत ठोस उपाययोजना करणे आवश्यक

अनेक देशांनी कोरोना व्हायरसमुळे लादलेले निर्बंध हटवण्यास सुरुवात केली आहे. यावर जागतिक आरोग्य संघटना(डब्ल्यूएचओ)ने अशा देशांना जास्त सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. डब्ल्यूएचओच्या इमरजंसी प्रोग्रामचे प्रमुख डॉ. माइक रेयान यांनी सोमवारी म्हटले की, ''आता आम्हाला थोडी आशा दिसत आहे. जगातील अनेक देश लॉकडाउन हटवत आहेत, पण यानंतर त्या देशांना जास्त सावध राहण्याची गरज आहे.''

लॉकडाउन हटवण्याबाबत डॉ. रेयान पुढे म्हमाले की, ''जर आजार कमी प्रमाणात आहे आणि याच्या क्लसटर्सची ओळख पटवण्याची क्षमता नसेल, तर व्हायरस परत पसरण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो. ज्या देशांची संक्रमण रोखण्याची क्षमता कमी आहे, अशा देशांनी लॉकडाउन हटवल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.''

चांगला सर्विलांस व्हायरसला रोखण्यास उपयोगी

रेयान पुढे म्हणाले की, 'मला आशा आहे की, जर्मनी आणि दक्षिण कोरिया नवीन क्लसटर्सची ओळख पटवू शकतील. या दोन्ही देशांमध्ये लॉकडाउन हटवल्यानंतर परत संक्रमण पसरले आहे.' यावेळी रेयान यांनी दोन्ही देशांच्या सर्विलांसचे कौतुक केले. म्हणाले की, 'सर्विलांसमुळे परत व्हायरस पसरण्यापासून रोखता येतो. आम्ही अशा देशांचेय उदाहरण देत आहोत, जे डोळे उघडून निर्बंध हटवत आहेत. तर, काही असेही देश आहेत, जे डोळे बंद करुन या आजारापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत आहेत.'

निर्बंध हटवणे अवघड- गेब्रयेसस

डब्ल्यूएचओचे संचालक डॉ. टेड्रॉस गेब्रयेसस म्हणाले, 'निर्बंध हटवणे अवघड आहे. जर लॉकडाउन हळु-हळू आणि एका ठराविक वेगाने हटवले गेले, तर यामुळे अर्थव्यवस्था वाचू शकते. संक्रमणाची दुसरी फेज पाहत असलेल्या जर्मनी, दक्षिण कोरिया आणि चीनसारख्या देशांकडे चांगल्या उपाययोजना करण्याची क्षमता आहे. जोपर्यंत व्हॅक्सीन तयार होत नाही, तोपर्यंत योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.'

बातम्या आणखी आहेत...