आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक आरोग्य संघटना कोरोना उत्पत्तीच्या पुढील तपासणीचे नियोजन करत आहे. परंतु, डब्लूएचओने या चौकशीचे नेतृत्व करु नये असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या उत्पत्तीवरुन अमेरिका आणि चीनमध्ये राजकीय तणाव सुरु आहे. त्यामुळे डब्लूएचओ कोरोना उत्पत्तीच्या योग्य निकालापर्यंत पोहोचू शकणार नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला डब्लूएचओच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख डॉ. मायकल रयान यांनी आम्ही या चौकशीचे पुढील नियोजन करत असल्याचे सांगितले होते.
डब्लूएचओ चीनला यासाठी सहकार्य करण्यास भाग पाडू शकत नाही, ते केवळ विनंती करु शकतात. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात ही चौकशी यशस्वी होऊ शकत नसल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. त्यासोबतच चीन गेल्या दीड वर्षापासून डब्लूएचओवर मात करत असल्याचे जॉर्जटाऊन विद्यापीठातील डब्लूएचओचे अधिकारी लॉरेन्स गोस्टिन यांनी म्हटले आहे.
कोरोना व्हायरस लॅबमधून आला नाही - डब्लूएचओ
कोरोना महामारीच्या उत्पत्तीवर सुरुवातीपासून अनेक दावे प्रती दावे केले जात आहेत. परंतु, हे व्हायरस एखाद्या प्राण्यांपासून मानवापर्यंत आले असल्याचे डब्लूएचओने सांगितले होते. जागतिक आरोग्य संघटनेदेखील हा व्हायरस लॅबमधून लिक झाला नसल्याचे म्हटले होते.
परंतु, अमेरिका सतत चीनवर हा व्हायरस लॅबमधून लिक झाल्याचा आरोप करत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये राजकीय तणाव सुरु आहे व याच पार्श्वभूमीवर डब्लूएचओ योग्य त्या निकालापर्यंत पोहोचणार नसल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.