• Home
  • International
  • WHO's New Warning on corona virus Kids Are Not Safe, Not Just Lockdown Benefits, Restrictions Needed

डब्ल्यूएचओचा नवा इशारा- लहान मुलेही सुरक्षित नाहीत, केवळ लॉकडाऊनने फायदा नाही, निर्बंध पाळावे लागतील

  • लहान मुले विषाणूपासून सुरक्षित असल्याचा दावा चुकीचा, त्यांचे भवितव्य धोक्यात
  • भविष्यात अनेक गंभीर आजार उद्भवण्याची भीती
  • सायलेंट कॅरिअरमध्ये लक्षणे दिसत नाहीत, म्हणून वेगाने पसरतोय विषाणू, चीनवर होऊ शकतो पुन्हा हल्ला

दिव्य मराठी

Mar 24,2020 11:03:00 AM IST

भास्कर रिसर्च


चीनमध्ये १४ वर्षांच्या एका मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर, अमेरिकेत एक १२ वर्षांची मुलगी अॅमा व्हेंटिलेटरवर आहे. ती न्यूयॉर्कमधील अॅटलांटा रुग्णालयात जगण्याचा संघर्ष करत आहे. अॅमाने कोठेच प्रवास केलेला नाही, तसेच ती संसर्ग झालेल्या व्यक्तीच्याही संपर्कात आलेली नाही. या दोन्ही घटना त्या दाव्याच्या उलट आहेत ज्यात म्हटले होते की, कमी वयाची मुले कोविड- १९ पासून सुरक्षित आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही स्पष्ट केले आहे की, हा दावा चुकीचा अाहे आणि मुलांनाही संसर्ग होण्याची शक्यता मोठ्यांइतकीच आहे. संघटनेने इशारा दिला अाहे की, मुलांमधील कोरोनाचा संसर्ग भविष्यात अनेक गंभीर आजारांचे कारण होऊ शकतो. यामुळे त्यांच्या आईवडिलांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. कारण आपल्याला माहीत नाही की हा आजार कोणत्या पातळीवर असेल. सध्या आपल्याकडे आकडेवारी नाही. आपल्याला स्वीकारावे लागेल की, कोरोनापासून कोणीच सुरक्षित नाही. सर्वांनी सावधानता बाळगायला हवी.

केवळ लॉकडा‌ऊन नव्हे, नियम पाळणे आवश्यक

डब्ल्यूएचओचे अधिकारी मायक रायन यांनी स्पष्ट केले की, भारतासारख्या मोठ्या संख्येच्या देशात लॉकडाऊन उपयोगी नाही जोपर्यंत नियमांचे पालन होत नाही. असे न करता बाहेर आल्यावर विषाणूचा धोका पुन्हा वाढेल.

कोरोना संसर्गात लक्षणे दिसतील हे आवश्यक नाही

कोरोनाची लक्षणे दिसतील हे आवश्यक नाही. चीनमधील माहिती दर्शवते की, कोरोनाच्या प्रत्येक तीन रुग्णांपैकी एक सायलेंट कॅरिअर असतो. त्याच्यामुळे तो गतीने पसरत आहे. हे ४३००० लोकांच्या तपासणीनंतर समजले.

चीनमध्ये पुन्हा पसरू शकतो कोरोना, घातक परिणाम होतील

चीनमधील नामांकित कोरोना विषाणू तज्ञांपैकी एक प्रा. ली लन्जुआन यांनी इशारा दिलाय की, देश- विदेशातून आलेल्या नव्या लोकांमध्ये संसर्ग वाढल्याने चीनला कोरोनाच्या दुसऱ्या संकटाचा मुकाबला करावा लागेल.

X