आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनर:भारतातील एका विधानावर एवढा गदारोळ, पण चीनमधील मुस्लिमांच्या दडपशाहीवर मुस्लिम देश शांत का?

अभिषेक पाण्डेय / नीरज सिंह23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर अनेक मुस्लिम राष्ट्रांनी भारताकडे माफीची मागणी केली आहे. इराक, इराण, कुवैत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, मलेशिया, यूएई, जॉर्डन, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बहारीन, मालदिव, लीबिया, तुर्की व इंडोनेशिया या 16 मुस्लिम राष्ट्रांनी या प्रकरणी भारताकडे अधिकृत विरोध नोंदवला आहे. तसेच 57 मुस्लिम राष्ट्रांच्या संघटनेनेही (ओआयसी) नुपूर यांच्या विधानावर हरकत नोंदवली आहे.

आता सोशल मीडियावर एका चुकीच्या विधानावर भारताविरोधात मोर्चा उघडणारे अरब राष्ट्र चीनमधील लाखो उईघुर मुस्लिमांच्या दडपशाहीवर गप्प का? असा कळीचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे चला तर मग अखेर अरब देश चीनच्या या अन्यायावर का शांत राहतात? चीन व त्यांच्यातील मैत्रीचे गुपित काय? हे जाणून घेऊया...

चीनचा 10 लाख उईघुर मुस्लिमांवर अत्याचार

उईघुर चीनच्या शिनजियांग प्रांतात राहणारे मुस्लिम आहेत. त्यांची लोकसंख्या जवळपास 1.20 कोटी आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, चीन उईघुर मुस्लिमांचे गत अनेक वर्षांपासून सुनियोजितपणे शोषण करतो. या प्रकरणी त्याच्यावर उईघुर मुस्लिमांच्या नरसंहारापासून वेठबिगारी, नसबंदी व महिलांवर बलात्काराचे गंभीर आरोप आहेत.

मानवाधिकारी संघटनांनी चीनवर सुमारे 10 लाख उईघुर मुस्लिमांना बंदी केल्याचा आरोप केला आहे.

गतवर्षी चीनच्या एका माजी पोलिस अधिकाऱ्याने ब्रिटनच्या स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, चिनी डिटेंशन केंद्रात उईघुर मुस्लिमांच्या तोंडात पाइप टाकून हात-पाय बांधले जातात. त्यांना अनेक दिवस उपाशी ठेवले जातात. काही प्रकरणांत बेदम मारहाण करुन त्यांना ठारही मारले जाते.

चीनने 16 हजारांहून अधिक मशिदी नष्ट केल्या

चिनी सरकारच्या आकडेवारीनुसार, 2015-2018 दरम्यान उईघुर मुस्लिमांच्या बहुतांश भागांतील जन्मदर तबब्ल 60 टक्क्यांनी घसरला आहे. 2019 मध्ये शिनजियांगमधील जन्मदर 24 टक्क्यांनी घसरला आहे. 2017 मध्ये चीनने या प्रांतातील 16 हजारांहून अधिक मशिदी नष्ट केल्या. लाखो मुलांना बळजबरीने त्यांच्या पालकांकडून हिसकावून बोर्डिंग शाळांत पाठवले.

चीनवर 2014 पासून किमान 630 इमाम व अन्य मुस्लिम धार्मिक नेत्यांना अटक केल्याचाही आरोप आहे. यातील 18 जणांचा कोठडीत मृत्यू झाला आहे. वृत्तानुसार, चीन केवळ शिनजियांगच नव्हे तर चीनबाहेरही उईघुर मुस्लिमांवर नजर ठेवण्यासाठी त्यांची ट्रॅकिंग करतो. एवढेच नाही तर त्यांच्यावर दाढी न ठेवण्याची सक्तीही करतो. उईघुर प्रवाशांची वैयक्तिक माहिती प्रशासनाला सोपवण्यासाठी मजबूर करतो. त्यांच्या कुटूंबियांना धमक्या देतो.

चीनवर गत काही वर्षांत शिनजियांग प्रांतातील 16 हजार मशिदी नष्ट केल्याचा आरोप आहे.
चीनवर गत काही वर्षांत शिनजियांग प्रांतातील 16 हजार मशिदी नष्ट केल्याचा आरोप आहे.

अरब राष्ट्रांकडून चीनमधील उईघुर मुस्लिमांच्या शोषणाचे समर्थन

मुस्लिम देश उईघुर मुस्लिमांच्या प्रकरणांत केवळ चीनचे समर्थनच करत नाहीत, तर उईघुर मुस्लिमांविरोधात चीनकडून चालवण्यात येणाऱ्या जागतिक मोहिमेलाही पाठिंबा देतात. इजिप्त, मोरक्को, कतार, सौदी अरेबिया यूएई या 6 देशांनी चीनच्या इशाऱ्यावर उईघुर मुस्लिमांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी चीनमध्ये केली आहे.

चीन शिनजियांग प्रांतातील बहुसंख्यक उईघुर मुस्लिमांविरोधातील आपली कारवाई दहशतवाद व कट्टरतावाद रोखण्यासाठी व देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचा युक्तिवाद करतो. यासंबंधी गत अनेक वर्षांपासून त्याचा प्रोपेगेंडा सुरू आहे. मार्च 2019 मध्ये सौदी स्थित मुस्लिम देशांच्या ओआयसीस ंघटनेने चीनच्या मुस्लिम नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांवर आनंद व्यक्त केला होता.

अरब देशांत सर्वात ताकदवान मानल्या जाणाऱ्या सौदी अरेबियानेही अनेकदा चीनकडून होणाऱ्या उईघुर मुस्लिमांच्या अन्यायाचे समर्थन केले आहे. 2019 मध्ये चीनच्या दौऱ्यावर गेलेल्या क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांनी चीनच्या शिनजियांग प्रांतातील उईघुर विरोधी कारवाईला खूला पाठिंबा दिला होता.

चीनने शिनजियांग प्रांतातील उईघुर मुस्लिमांवर नजर ठेवण्यासाठी मशिदींच्या आसपास सर्व्हिलांस कॅमेरे लावले आहेत.
चीनने शिनजियांग प्रांतातील उईघुर मुस्लिमांवर नजर ठेवण्यासाठी मशिदींच्या आसपास सर्व्हिलांस कॅमेरे लावले आहेत.

द टाइमच्या वृत्तानुसार, 2002 पासून चीनच्या इशाऱ्यावर अरब देशांनी जवळपास 292 उईघुरांना ताब्यात घेतले किंवा त्यांना डिपोर्ट केले. यंदाही सौदी अरेबियाने 2 उईघुरांना अटक करुन चीनला सुपूर्द केले होते.

चीनची अरब देशांवरील पकड एवढी मजबूत आहे की, जुलै 2017 मध्ये चीनच्या इशाऱ्यावर इजिप्तने 200 उईघुर मुस्लिमांना त्यांचे घर, रेस्टॉरंट, मशिद व विमानतळावरुन अटक केली होती. यातील बहुतांश जण इजिप्तच्या अल-अजहर विद्यापीठाचे विद्यार्थी होते. या विद्यार्थ्यांना इजिप्त्च्या कुख्यात स्कॉर्पियन तुरुंगात बंदिस्त करण्यात आले होते. तिथे चिनी गुप्तहेर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी करण्यात आली होती. यातील 45 विद्यार्थी इजिप्तने चीनच्या ताब्यात दिले. त्यांचा आजतागायत कोणताही पत्ता लागला नाही.

चीन उईघुर मुस्लिमांवर करडी नजर ठेवतो. 2014 मध्ये इमाम हत्या झाल्यानंतर चीनच्या काश्गरमधील एका मशिदीबाहेर तैनात चिनी सैनिक.
चीन उईघुर मुस्लिमांवर करडी नजर ठेवतो. 2014 मध्ये इमाम हत्या झाल्यानंतर चीनच्या काश्गरमधील एका मशिदीबाहेर तैनात चिनी सैनिक.

चीनकडून हज यात्रेवेळीही उईघुरांची अटक

सौदी स्थित मुस्लिमांचे पवित्र स्थळ मक्का व मदिनाची हज यात्राही चीनसाठी उईघुर मस्लिमांना पकडण्याचा एक प्रमुख पर्याय बनली आहे. या यात्रेच्यावेळी चीन जगभरातून येणाऱ्या या मुस्लिम समुदायाच्या नागरिकांवर नजर ठेवून त्यांना अटक करवतो. भूतकाळात हज यात्रेला जाणाऱ्या उईघुरांच्या ट्रॅकिंगसाठी त्यांच्या गळ्यात स्मार्टकार्डसारखे ट्रॅकिंग डिव्हाइसही डकवण्यात येत होते.

तुर्की या एकमेव मुस्लिम राष्ट्राने चीनच्या या दमनशाहीविरोधात आवाज उठवला आहे. 2009 मध्ये तुर्कीने शिनजियांगमधील उईघरांवरील हिंसाचाराचा विरोध केला होता. पण, चीनने त्यावरही तीव्र हरकत घेतली. चीनच्या नाराजीमुळे तुर्कीने नंतर या मुद्यावर भाष्य करणे बंद केले.

सौदी, यूएई सारख्या मुस्लिम राष्ट्रांनी चीनच्या शिनजियांग पॉलिसीचे समर्थन केले.

सौदी अरेबियाने 2019 व 2020 मध्ये संयुक्त राष्ट्र संघात चीनच्या शिनजियांग धोरणाचे समर्थन केले होते. 2019 मध्ये इजिप्त, बहारीन, पाकिस्तान, यूएई, सौदी अरेबियासारख्या मुस्लिम देशांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनेत चीनची उघड बाजू घेतली होती. शिनजियांगमध्ये दहशतवाद, फुटीरतावाद आणि उग्रवादाचा सामना केल्यानंतर चीनने तेथे सुरक्षा प्रस्थापित केल्याचा दावा यासंबंधीच्या प्रस्तावात करण्यात आला होता.

रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्यावर हे मुस्लिम देश होतात आक्रमक

चीनच्या उईघुर मुस्लिमांच्या शोषणाकडे दुर्लक्ष करणारे हे मुस्लिम देश अन्य ठिकाणच्या मुस्लिमांवर होणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष करतात असे नाही. 2017 मध्ये म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांविरोधात झालेल्या हिंसाचारावर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. विशेषतः सौदी अरेबियाने संयक्त राष्ट्रातही या घटनेचा तीव्र निषेध केला होता. स्वतःला मुस्लिम देशांचा आवाज म्हणवणाऱ्या ओआयसीनेही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. ​​​​​​​

मुस्लिम देश या 3 कारणांमुळे चीनविरोधात बोलत नाहीत

  1. चीनच्या बेल्ट अँड रोड उपक्रमापुढे मुस्लिम देश नतमस्तक
  2. चीनची 50 मुस्लिम देशांतील 31 लाख कोटींची गुंतवणूक
  3. मुस्लिम देशांचे स्वतःचे मानवाधिकार रेकॉर्डही वाईट
बातम्या आणखी आहेत...