आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ब्रिटन:चीनवर 680 कोटी का उधळले ? खासदारांत नाराजी; चौकशीची मागणी

लंडन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेनंतर ब्रिटनमध्येही चीनवर रोष

ब्रिटनने एक वर्षात चीनला परदेशी मदतीअंतर्गत ६८० कोटींची मदत दिली. आंतरराष्ट्रीय विकास विभागाच्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली. हा अहवाल जाहीर झाल्यानंतर खासदारांनी सरकारला या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे. इयान डंकन स्मिथसह इतर खासदारांनी सरकारला अखेर चीनला एवढा निधी का दिला, अशी विचारणा केली.

चीनची अर्थव्यवस्था ब्रिटनच्या तुलनेत पाचपटीने जास्त आहे. अशा स्थितीत ब्रिटनने आपले भवितव्य चीनच्या हवाली का करावे? जगातील सर्व प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या देशाची सरकार का मदत करत आहे? चीनच्या प्राथमिक शाळा व वन्यजीवांच्या बेकायदा व्यापाराविरोधात योजनेवर काही रक्कम खर्च करण्यासाठी निधी देण्यात आला. खासदारांनी सरकारच्या या धोरणावर आश्चर्य व्यक्त केले. तंत्रज्ञानाच्या शिक्षणात अग्रस्थानी असलेल्या देशाला प्राथमिक शाळेचा खर्च उचलण्यासाठी ब्रिटनकडून आर्थिक मदतीची गरज का पडत आहे? असे प्रश्न खासदारांनी उपस्थित केले. वास्तविक चीन अंतराळ क्षेत्रात मोठे कार्यक्रम राबवत आहे. चीनला २०१८ मध्ये ही रक्कम पाठवण्यात आली होती.

प्रत्येक कर्मचाऱ्याची कमाई वर्षभरात ६७ लाखांवर गेली..

चीनला मदत करण्यामागे काहीतरी गडबड असल्याची शंका खासदारांनी उपस्थित केली आहे. या अहवालात आंतरराष्ट्रीय विकास विभागातील कर्मचाऱ्यांशी संबंधित धक्कादायक प्रकरणांचा उल्लेख आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांचे सरासरी उत्पन्न एक वर्षात सुमारे ६७ लाख रुपये झाले. अनेक कर्मचाऱ्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत.