आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिशोरवयीन मुले आपले म्हणणे ऐकत नसल्याने बहुतांश माता त्रस्त असतात. जे मूल लहानपणापासून आपली प्रत्येक गोष्ट ऐकत होते त्याला अचानक काय झाले, असा प्रश्न आईला पडतो. आई असा विचार करत असेल तर त्यासाठी किशोरवयीन मुलांना दोष देऊ नका. किशोरवयींनाच्या मेंदूवर झालेल्या नव्या शोधातून असे आढळले की, काही आवाजांबाबत आपली प्रतिक्रिया स्वाभाविकपणे काळानुसार बदलते. त्यामुळेच किशोरवयीन मुलांना आईचा आवाज कमी महत्त्वाचा वाटतो. संशोधनात १२ वर्षे आणि त्याखालील मुलांच्या मेंदूचे स्कॅनिंग करण्यात आले, तेव्हा त्यात आईच्या आवाजावर चांगली न्यूरॉलॉजिकल प्रतिक्रिया दिसली. तथापि, वयाच्या १३ व्या वर्षानंतरच त्यात बदल होतो. त्यांच्या मेंदूत आईव्यतिरिक्त इतर सर्व आवाजांबाबत जास्त प्रतिक्रिया दिसते. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ डॅनियल अॅम्ब्रॉस यांनी सांगितले की, ‘किशोरवयात मुलांना नवे मित्र, सहकारी मिळतात आणि त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करण्याची त्यांची इच्छा असते. त्यांचे मन अपरिचित आवाजांकडे अधिक आकर्षित होते.’ न्यूरोसायंटिस्ट विनोद मेनन म्हणतात,‘ किशोरवयीन मुले आपल्या पालकांचे म्हणणे न एेकून बंड करत असल्याचे दिसते. त्याचे कारण म्हणजे त्यांचा मेंदू घराबाहेरील आवाजांकडे जास्त लक्ष देऊ लागतो.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.