आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविदेशात नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी दुबई तिसरा पर्याय आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या(बीसीजी) सर्व्हेनुसार, प्रथम लंडन तर दुसरी पसंत अॅम्स्टर्डम आहे. असे असताना दुबई आता भारतीय टेक टॅलेंटची भरती करत आहे. यूएई सरकार त्यांना सवलत व सुविधा देत आहे. हे समजून घेऊया...
{भारतीय टेक टॅलेंटला काय सुविधा मिळताहेत? दुबई सरकार भारतीय स्टार्टअप आणि टेक टॅलेंटच्या भरतीसाठी करमुक्त उत्पन्न देत आहेत. गोल्डन व्हिसासारख्या सुविधा देत आहे. अधिक उत्पन्नाच्या व्यक्ती आणि भारताच्या उद्योजकांना करात सवलत, जागतिक सुविधेची पायाभूत सुविधा, चांगले जीवन, व्यवसाय सुलभ नियमन, वेगवान क्लियरन्स देत आहे.
{आतापर्यंत किती गोल्डन व्हिसा जारी झाले? २०१९ ते २०२२ पर्यंत दुबई सरकारने १.५ लाख गोल्डन व्हिसा जारी केले आहेत. यामध्ये बहुतांश भारतीय आहेत. हे व्हिसा १० वर्षांसाठी दुबईत राहणे आणि काम करण्याासाठी परवानगी देते.
{दुबईत किती भारतीय कंपन्या आहेत? दुबईत दोनशेवर भारतीय कंपन्या आहेत. या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, बिग डेटा, इंटरनेट ऑफ थिंग्ज(आयओटी), मेटाव्हर्स, वेब ३.०, हेल्थटेक व स्मार्ट शहरांसह तंत्रज्ञान नवोन्मेषावर काम करतात. दुबईत ३४०० सक्रिय आयटी कंपन्या आहेत.
{यूएई सरकार कोणत्या योजनेवर काम करतेय? दुबई २०३० पर्यंत २५% प्रवाशांना स्वायत्त मोडवर आणत आहे. सध्या १०-११% आहे. चालकरहीत महानंगरानंतर टॅक्सीवर लक्ष आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.