आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी एक्‍सप्‍लेनर:कोरोनाच्या तीन वर्षांनंतर चीन का मागे पडला?

चीन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना विषाणूच्या पहिल्या रुग्णाचे निदान झाल्याच्या घटनेला गुरुवारी ३ वर्षे पूर्ण झाली. चीनने हा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनचे मॉडेल दिले. लसींच्या सहायाने जग महामारीतून सावरले आहे. दुसरीकडे, चीन ३ वर्षांनंतर मागे पडला आहे. अमेरिकेेत सॅन डिएगो स्कूल ऑफ ग्लोबल पॉलिसी अँड स्ट्रॅटेजीचे प्रा. व्हिक्टर शिह यांनी ही स्थिती विषद केली...

{चीनच्या कठोर धोरणांमुळे लोकांत राग का? चीनने देशाच्या लोकांना कोविडपासून बचाव करण्यासाठी झिरो कोविड धोरणाअंतर्गत कठोर निर्बंध घातले. याचा परिणाम असा झाला की, लोक संसर्गित झाले नाहीत आणि त्यांच्यात विषाणूशी लढण्याची रोगप्रतिकारशक्तीही निर्माण झाली. दुसरीकडे, जगात मोठ्या प्रमाणात लोक संसर्गित झाले. यामुळे हर्ड इम्युनिटी आली. परिणामकार लसी सहायक ठरल्या. चीनन्या लसी कमी परिणामकारक राहिल्या. कडक लॉकडाऊनमुळे लोकांना कैद्यांप्रमाणे जगायला भाग पडले. चीन अापल्या जाळ्यात अडकला.

{चिनी सरकारच्या धोरणात मवाळपणा येतोय? चीनने आंदोलन दडपण्यासाठी साध्या वेषात पोलिस तैनात केले आहेत. दमनासाठी शक्य ती पावले उचलली जात आहेत. असे असतानाही आंदोलन सुरू आहे. यामुळे चीनची भूमिका मवाळ झाली. देशाचे उपपंतप्रधान सुन म्हणाले, रुग्ण वाढत असले तरी शांघायमधील लॉकडाऊन हटवत आहोत. लसीकरण वाढेल.

{आंदोलने थांबतील का? सरकार कोविड झिरो धोरणावरून मागे सरकारल्यास आंदोलने थांबतील,असे सांगणे कठिण आहे. लोकांत संताप आहे. त्यांच्या स्वातंत्र्यात अडथळे आले. सरकार आंदोलन दाबवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. देशभरात जवानांची तैनाती केली जात आहे. एक-दोन दिवसांत विरोधी स्वर दाबवला जाईल.

{स्थिती सरकारच्या हाताबाहेर का गेली? चीनची आरोग्य प्रणाली मर्यादीत आहे. रुग्णवाढ आणि रुग्ण गंभीर होण्यास सुरुवात झाल्यास चीनमध्ये त्याचा सामना करण्याचे साधने कमी आहेत. त्यांच्या लसी कमी परिणामकारक आहेत. ज्येष्ठांना चौथा डोस नाही. लोकांचा संताप, अर्थव्यवस्थेचे आव्हान आहे.

बातम्या आणखी आहेत...