आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटर डीलवर मस्क यांचा यू टर्न का?:ट्विटरची डील झाली, नाही झाली तरी लागू शकतो दंड

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक इलाॅन मस्क यांनी ट्विटर डीलबाबतत पुन्हा एकदा यू टर्न घेतला आहे. ट्विटर खरेदी करण्यासाठी ते तयार झाले आहेत. ५४.२० डॉलर प्रति शेअरप्रमाणे ते डील पूर्ण करू इच्छित आहेत.

-मस्क यांनी का बदलला विचार? मस्क यांनी १४ एप्रिल रोजी ४३ अब्ज डॉलरमध्ये (जवळपास साडेतीन लाख कोटी) ट्विटर खरेदीचा प्रस्ताव दिला होता, मात्र स्पॅम आणि बोट्स अकाऊंटची माहिती न दिल्याचा आरोप करून व्यवहार रद्द केला. ट्विटरने न्यायालयात धाव घेतली. १७ ऑक्टोबरपासून न्यायालयात सुनावणी होईल. जर इलॉन हा खटला हारले तर न्यायालय डील रद्द करण्यासह दंड आकारू शकते. त्यामुळे हा व्यवहार आणखी महागडा होईल.

-डीलमधून माघार घेण्याचे काय कारण होते? िट्वटरमधून काढून टाकल्यानंतर माजी सेक्युरिटी हेडने लाखाे स्पॅम अकाऊंट असल्याची माहिती दिली. सायबर सुरक्षा तज्ञ पीटर मुडगे जटको यांनी जुलैमध्ये नियंत्रक आणि न्याय विभागात तक्रार दाखल केली. सायबर सुरक्षेला नियंत्रित करणाऱ्या नियमांत अनेक बदल करावे लागतील, असे त्यात म्हटले होते.

-मस्क यांनी ट्विटरचा फायदा की नुकसान केला? मस्क यांनी डीलवर यू टर्न घेतल्यानंतर ट्वीट केले, ट्विटर एक्स बनवण्याचा दिशेने हे आणखी एक पाऊल आहे. एक्स, द एव्हरीथिंग अॅप. दुसरीकडे, मस्क यांच्याप्रती न्यायाधीशांचा दृष्टीकोन योग्य दिसत नाही.

बातम्या आणखी आहेत...