आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका महिलेच्या पतीचे हार्ट अटॅकने निधन झाले. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. 3 मुलांच्या संगोपनाची जबाबदारीही तिच्या खांद्यांवर आली. कुटुंबाची आर्थिक स्थितीही फारशी चांगली नव्हती. पण मध्येच असे काही घडले की, एका झटक्यात महिलेचे नशीब बदलले. ती कोट्यधीश झाली.
मिरर यूकेच्या वृत्तानुसार, 54 वर्षीय या महिलेचे नाव लेस्ली मॅकनेली आहे. ती ब्रिटनच्या मँचेस्टरमध्ये राहते. गतवर्षी त्यांचे 59 वर्षीय पती गॅरी यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. गॅरी यांच्या मृत्यूमुळे लेस्ली आतून कोसळल्या. त्यांच्यावर आपल्या 3 मुलांसह संपूर्ण घराची जबाबदारी आली.
यामुळे लेस्ली काहीशा हैरान झाल्या होत्या. पण त्यांची समस्याही लवकरच सुटली. कारण, त्यांना लॉटरी लागली होती. ती ही तब्बल 1 कोटी 72 लाख रुपयांहून अधिकची. उल्लेखनीय बाब म्हणजे या लॉटरीचे तिकीट लेस्ली यांचे पती गॅरी यांनी खरेदी केले होते. पण लकी ड्रॉ निघण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
लेस्ली यांनी सांगितले की, People’s Postcode Lottery ने त्यांच्या लॉटरीच्या तिकिटाच्या नंबरची घोषणा केली तेव्हा त्यांना रडू आले. त्यांना समजत नव्हते की, आनंद साजरा करावा की पतीच्या आठवणींत रडावे. कारण, लॉटरीचे तिकीट त्यांनीच खरेदी केले होते. लेस्ली म्हणतात - एकीकडे लॉटरी जिंकल्याचा आनंद होता. तर दुसरीकडे, पतीच्या मृत्यूचे दुःख होते. हा आनंद साजरा करण्यासाठी तो हयात नव्हता. गॅरी व लेस्ली गत 37 वर्षांपासून सुखी संसार करत होते.
कार शोरूममध्ये काम करणाऱ्या लेस्ली यांनी सांगितले की, बक्षीसाच्या या रकमेमुळे माझ्या कुटुंबाचे जीवन बदलणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही गॅरी यांना लॉटरी लागली होती. पण बक्षीसाठी रक्कम खूप कमी होती. लेस्ली यांच्या मते, ही रक्कम त्यांच्या मुलांच्या उपयोगी पडेल. त्यांचे जीवनमान सुधारेल. त्यांना एखादा नवी उद्योग सुरू करता येईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.