आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाॅशिंग्टन:हल्ला करणार नाही, करण्यापूर्वी इशारा देऊ; अमेरिकन सैन्यप्रमुखांची चीनच्या लष्करप्रमुखांशी चर्चा

वाॅशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जनरल मिली यांचे दावे बिनबुडाचे : ट्रम्प

अमेरिकेत गेल्या वर्षी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डाेनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला हाेता. त्यामुळे बिथरलेल्या ट्रम्प यांनी सुरक्षेवरून उच्च पातळीवर दहशतीचे वातावरण तयार केले हाेते. त्यातून चीनविराेधात युद्ध सुरू हाेण्याची चिन्हे हाेती. अण्वस्त्र हल्ल्याचीही भीती हाेती. म्हणूनच अमेरिकेच्या लष्करप्रमुखांनी चीनच्या लष्करप्रमुखांशी फाेनवरून चर्चा केली. अमेरिकेच्या सैन्यप्रमुखांनी चीनच्या लष्करप्रमुखांना गाेपनीय काॅल करून आश्वस्त केले हाेते. तूर्त आम्ही हल्ला करणार नाही. त्यांनी दाेन वेळा फाेन केला हाेता. ‘पेरिल’ नावाच्या नव्या पुस्तकात याबाबतचा दावा करण्यात आला आहे. वाॅशिंग्टन पाेस्टचे पत्रकार बाॅब वुडवाॅर्ड, राॅबर्ट काेस्टा यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. २०० सूत्रांशी केलेल्या चर्चेवर आधारित हे पुस्तक आहे. पुढील आठवड्यात या पुस्तकाचे प्रकाशन हाेईल. ट्रम्प यांच्या कार्यकाळात चीनसाेबतचे अमेरिकेचे संबंध अतिशय वाईट स्थितीत हाेते.

उभय देशांत व्यापारी युद्ध सुरू झाले हाेते. परिस्थिती अतिशय वेगळी वाटू लागली. त्यामुळे अमेरिकेचे जनरल मार्क मिली यांनी युद्धाला सुरुवात हाेऊ नये म्हणून चीनचे जनरल ली झुआेचेंग यांना दाेन वेळा गुप्त काॅल केला हाेता. दक्षिण चीन सागरी क्षेत्र व काेराेनावरून तणाव तीव्र झाला हाेता. अमेरिकन निवडणुकीच्या चार दिवसांपूर्वी ३० आॅक्टाेबर २०२० मिली यांनी काॅल केला. अमेरिकेत स्थैर्य आहे. सर्वकाही ठीक हाेईल. आम्ही चीनवर हल्ला करणार नाही. तसा काही हल्ला हाेणार असल्यास तुम्हाला वेळेत कळवले जाईल. कॅपिटल हिलवर हल्ल्यावेळी मिलीने दुसरा काॅल ८ जानेवारीला केला. तेव्हा ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेवर हल्ला केला हाेता. या वेळी मिली म्हणाले, आम्ही १०० टक्के स्थिर आहाेत. सर्वकाही ठीक आहे. अनेक वेळा लाेकशाहीत अशी अस्थिरता येऊ शकते.

जनरल मिली यांचे दावे बिनबुडाचे : ट्रम्प
ट्रम्प यांनी पत्रकारांचे हे दावे फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, हे सत्य असल्यास जनरल मिलीवर देशद्राेहाचा खटला चालवला जावा. चीनवर हल्ला करण्याचा मी कधी विचारही केला नाही. जनरल मिली यांच्या कार्यालयाने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. रिपब्लिकन सिनेटर मार्काे रुबियाे यांनी बायडेन यांच्याकडे मिली यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...