आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तानमध्ये 3 दिवसांत नवे सरकार:काश्मिरात हस्तक्षेप करणार नाही, भारताशी चांगले संबंध ठेवण्याची इच्छा : तालिबान

काबूल23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तालिबानने अतिरेकी संघटना अल कायदाची मागणी फेटाळली

अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये अल कायदाचे कंबरडे मोडले होते, पण अमेरिकी सैन्य परत जाताच अल कायदाने पुन्हा रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकी सैन्याच्या माघारीनंतर दुसऱ्याच दिवशी, ‘अफगाणिस्तानप्रमाणेच लेव्हंट, सोमालिया, येमेन आणि काश्मीरलाही स्वतंत्र करावे,’ असे अल कायदाने तालिबानला सांगितले.

तथापि, तालिबानने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, आम्ही अफगाणिस्तानला दहशतवाद्यांच्या हातात जाऊ देणार नाही. तालिबानचा नेता अनस हक्कानीने बुधवारी सांगितले की, आम्ही काश्मीरच्या मुद्द्यात कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही. आम्हाला भारताशी मैत्रीपूर्ण आणि चांगले संबंध ठेवण्याची इच्छा आहे. काश्मीर आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. आम्ही आमच्या धोरणाविरुद्ध काम करणार नाही.

यूएनने तालिबानला दिली सरकारची मान्यता, रशिया-चीनचा विरोध

  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने भारताच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
  • तो अफगाणिस्तानात तालिबानला सरकारप्रमाणे काम करणाऱ्या व्यक्तीची मान्यता देतो.
  • त्यात म्हटले की, तालिबानने अफगाणिस्तानचा वापर कुठल्याही देशाला धमकावणे, हल्ला करणे किंवा दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी करू नये.
  • प्रस्ताव फ्रान्स, ब्रिटन, अमेरिकेने मांडला होता. भारतासह १३ सदस्यांनी त्याला मान्यता दिली.
  • स्थायी सदस्यांत मतभेद दिसले. चीन-रशियाने व्हेटो केला नाही. ते मतदानास आले नाहीत.
  • प्रस्ताव घाईघाईत आणला, असा आरोप दोन्ही देशांनी केला आहे.
  • भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष शृंगला संयुक्त राष्ट्रांच्या या सत्राचे अध्यक्ष होते. त्याबरोबरच यूएनएससीच्या अध्यक्षपदाचा भारताचा कार्यकाळ पूर्ण झाला.
  • २०१० मध्ये यूएनने तालिबानवर लावलेले निर्बंध हटवले आहेत.

तालिबानच्या सरकारमध्ये महिलाही असतील
कतारमध्ये तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे उपप्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टानिकझईंनी सांगितले की, तीन दिवसांत नव्या सरकारची घोषणा केली जाईल. जे २० वर्षांपासून सरकारमध्ये आहेत त्यांना त्यात सहभागी करून घेतले जाणार नाही. नव्या सरकारमध्ये चांगले आणि शिक्षित लोक असतील. महिलांचाही समावेश असेल. तत्पूर्वी, सरकारची गठन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे तालिबान नेता अनस हक्कानीनेही म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...