आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानचा नवा फतवा:बुरखा नसल्यास महिलेला दुकानातून सामान मिळणार नाही, विक्री केल्यास होणार शिक्षा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालिबानने अफगाणिस्तानात हिजाब न घालणाऱ्या महिलांसाठी नवे फर्मान जारी केले आहे. हिजाब न घालणाऱ्या महिलांना दुकानदारांनी कोणत्याही वस्तू विकू नये असे फर्मान तालिबानने अफगाणिस्तानच्या बल्ख प्रांतात जारी केले आहे. नव्या आदेशानुसार, जर एखाद्या दुकानदाराने हिजाब न घातलेल्या महिलेला काही वस्तू विकली, तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मजार-ए-शरीफ शहरातील प्रसिद्ध ब्ल्यू मशिदीकडून हे आदेश काढण्यात आलेत.
अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानचे सरकार आल्यानंतर तिथे सातत्याने महिलांवर हिजाब घालण्यासाठी जोर दिला जात आहे. दोन महिन्यांपूर्वी हिजाब न घालणाऱ्या महिलांची तुलनता तर जनावरांसोबत करण्यात आली होती. महिलांना छोटे किंवा तंग कपडे घालण्यासही मनाई करण्यात आली होती. यासाठी कंधार शहरात जागोजागी पोस्टर्स लावण्यात आले होते. हे पोस्टर्स मंत्रालयाच्या वतीने लावण्यात आले होते. मंत्रालयानुसार अफगाणिस्तानात सर्व महिलांना हिजाब घालणे बंधनकारक आहे.
तालिबान २.० कडून महिलांवर अनेक प्रतिबंध

ऑगस्टमध्ये सत्तेत परतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानात महिलांवर अनेक कठोर प्रतिबंध लादले आहेत. गेल्या मार्चमध्येही तालिबानने आदेश जारी करत पुरूष आणि महिलांना एकाच दिवशी मनोरंजन पार्कमध्ये जाण्यास बंदी घातली होती. यापूर्वीही तालिबानने महिलांवर अनेक प्रतिबंध लादले होते.
यानुसार महिलांनी एकटीने प्रवासावर बंदी, दूरच्या प्रवासासाठी पुरूष सोबती असणे गरजेचे, महिलांना वाहन चालक परवाना देण्यास बंदी, हिजाब घालणे बंधनकारक, दुकानांबाहेर लावलेले महिलांचे पोस्टर्स हटविणे अशा अनेक प्रतिबंधांचा समावेश आहे.
१० हजार मुलींना माध्यमिक विद्यालयांतून काढण्यात आले

१० हजारपेक्षा जास्त मुलींना माध्यमिक विद्यालयांतून काढण्यात आले आहे. सोबतच महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये पुन्हा परतण्यासही मनाई करण्यात आली आहे. मे मध्ये देशाचे सर्वोच्च नेते आणि तालिबान प्रमुख हिबतुल्लाह अखुंदजादांनी एका फर्मानाला मंजुरी दिली होती. यात म्हटले होते की, महिलांनी घरीच राहिले पाहिजे. जर त्यांना सार्वजनिक ठिकाणी जायचे असेल तर त्यांनी चेहऱ्यासह संपूर्ण शरीर झाकले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...