आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी राष्ट्रपती निवडणूक:प्रत्येक संकटात भारतासोबत उभा राहीन, पाकमधून होणाऱ्या दहशतवादी कारवाया सहन करणार नाही : जो बायडेन

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • हॅरिसपेक्षा जास्त भारतीय माझ्यासोबत : ट्रम्प

जर ते जिंकले तर त्यांचे प्रशासन भारतासमोरील प्रत्येक धोका दूर करण्यासाठी त्यांच्यासोबत उभे राहतील, असे सांगत अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाचे डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन यांनी भारत आणि अमेरिकेतील संबंध आणखी दृढ करण्याचे म्हटले आहे.

बायडेन यांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय-अमेरिका समूहाला सांगितले, मी १५ वर्षांपूर्वी भारतासोबत ऐतिहासिक असैन्य अण्वस्त्र करारास मंजुरी देण्याच्या प्रयत्नांचे नेतृत्व करत होतो. जर ते जिंकले तर भारत त्यांच्या सीमेत, भागात ज्या धोक्यांचा सामना करत आहे, त्याचा सामना करण्यासाठी ते सोबत राहतील. त्यांनी सांगितले की, मोहिमेचे नेतृत्व आमची लाडकी मैत्रीण (कमला हॅरिस) करतेय. त्या अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या भारतीय-अमेरिकी उपराष्ट्रपती असतील. आम्हाला माहीत आहे, त्या हुशार आहेत. मात्र, एक गोष्ट जी कमला यांना एवढी प्रेरणादायी बनवते ती आहे त्यांच्या आईची अमेरिकेत येण्याची गोष्ट, जी भारतात सुरू झाली. त्यांच्या धैर्याने त्यांच्या मुलींना येथपर्यंत पोहोचवले. तसेच डेमोक्रॅट्सच्या धोरणात्मक वक्तव्यात पाककडे इशारा करत म्हटले आहे, सीमेपलीकडच्या दहशतवादी कारवाया सहन केल्या जाणार नाहीत.

हॅरिसपेक्षा जास्त भारतीय माझ्यासोबत : ट्रम्प

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी न्यूयॉर्क पोलिसांच्या कार्यक्रमात सांगितले की, बायडेन जर राष्ट्राध्यक्ष झाले तर ते प्रत्येक पोलिस विभागाला चकवण्यासाठी एक कायदा मंजूर करतील. बहुतेक कमलाही असेच करतील. त्यांची भारतीय पार्श्वभूमी असली तरी माझ्यासोबत त्यांच्यापेक्षा जास्त भारतीय आहेत. विलिमंग्टनमध्ये प्रचारावेळी चर्चा करताना बायडेन आणि हॅरिस.

बातम्या आणखी आहेत...