आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Winter Olympics Europe On The Road Against China; Tibet, Uyghur, Hong Kong Are Remembered | Marathi News

विंटर ऑलिम्पिक:चीनच्या विरोधात युरोप रस्त्यावर; तिबेट, उईगर, हाँगकाँगची करून देताहेत आठवण, निर्वासित चिनी कलाकारांची पोस्टर्स ठरत आहेत विरोधाचे शस्त्र

प्राग / अनुराग शर्मा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विंटर ऑलिम्पिकच्या शुक्रवारच्या उद्घाटनासोबतच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या विरोधात युरोप रस्त्यावर उतरला आहे. झेक गणराज्याची राजधानी प्रागमध्ये जोरदार निदर्शने केली जात आहेत. जर्मनी, फ्रान्स, नॉर्वे, स्कॉटलंड, युनायडेट किंगडममधील अनेक शहरात लोकांनी रॅली काढल्या आहेत. अमेरिकेतही विरोध केला जात आहे. निदर्शकांचे म्हणणे आहे की, चीनने खेळांतील आपली प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जेव्हा की तिबेटमध्ये बळजबरीने कब्जा, उईगरमध्ये मुस्लिमांचा छळ आणि हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थकांवरील अत्याचार कोणापासूनही लपलेला नाही. प्रागमधील विरोध प्रदर्शनात चीनमधील प्रसिद्ध निर्वासित कलाकार बाडिकाओंच्या पोस्टर्सचा वापर केला जात आहे. बडिकाओ यांनी चीन सरकारचे अत्याचार दर्शवण्यासाठी पाच मुद्द्यांवर पोस्टर बनवले आहेत.

पुतिन-जिनपिंग भेटले, म्हणाले- रशिया-चीनच्या नात्याला अंत नाही
दम्यान, बीजिंगमध्ये विंटर ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात शुक्रवारी चीन आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आणि चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात वार्तालाप झाला. दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी करत म्हटले की, त्यांच्या नात्यात कोणतीही सीमा नाही. चीनने युक्रेनच्या मुद्द्यावर रशियाला पूर्ण समर्थन दिले आहे. निवेदनात म्हटले की, अमेरिका आणि इतर पश्चिम देश युरोपमध्ये अस्थिरता वाढवत आहेत. अमेरिकेकडून नाटोचा विस्तार करणे चुकीचे आहे.

ऑलिम्पिक नियमांसह कम्युनिस्ट पक्षाचे नियमही पाळणे गरजेचे
विरोध करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, खेळाडूंना ऑलिम्पिक नियमांसोबतच कम्युनिस्ट पक्षाचे नियमही पाळावे लागतात. बीजिंग ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष यांग यांग यांनी इशारा दिला की, सर्व खेळाडूंनी वक्तव्य करताना सावध राहावे. जर त्यांच्या वक्तव्यामुळे चिनी सार्वभौमत्वावर कोणताही हल्ला झाला तर त्याच्या विरोधात चीनच्या कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. उद्घाटन समारंभात कोणत्याही पश्चिम देशाच्या राजकारण्याने सहभाग घेतला नाही.

उईगर कॉटनवर कमाई, चीन त्यांच्यावरच करते अत्याचार
प्रागमधील द कापुतिन ग्रुपने ऑलिम्पिक आणि चिनी कापडांवर बहिष्कार टाकण्यासाठी चिनी राष्ट्रपतींचा नग्न पुतळा दूतावासासमोर ठेवत विरोध दर्शवला. ग्रुपच्या मते चीनमध्ये बहुतांश कॉटन उईगर मुस्लिमांच्या श्रमातून तयार होते. चीन कॉटन विकूनच पैसे कमावतो. परंतु उईगर मुस्लिमांवर अत्याचार करतो. चीनमध्ये राहणाऱ्या उईगर मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवले गेले आहे.

बातम्या आणखी आहेत...