आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

संशोधनात निष्कर्ष:मोबाइल इंटरनेट आल्याने अनेक देशांत लोकांचा सरकारवरील विश्वास घटला, 116 देशांतील 2232 क्षेत्रांतील संशोधनाचा निष्कर्ष

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निवडणुकीतही 3 जी नेटवर्कचा परिणाम, मते कमी झाली

जगातील विविध देशांत जसजसा मोबाइल इंटरनेटचा वापर वाढला, लोकांचा सत्ताधारी पक्षांवरील विश्वास कमी झाला. निवडणुकीत त्यांच्या मतदानाचा वाटा घटला. हा दावा नुकत्याच एका संशोधनात करण्यात आला. प्रख्यात रशियन अर्थशास्त्रज्ञ सेर्गी ग्यूरीव्ह, निकता मेल्निकोव व एकाटेरिना जूराव्सकाया यांनी त्यांच्या संशोधनात जगभरात वाढता मोबाइल ब्रॉडबँड व सध्याच्या सरकारांवरील कमी होणाऱ्या विश्वासाबाबत अभ्यास केला. जगात सध्या ४.१ अब्ज लोक ऑनलाइन आहेत व यातील बहुतांशी २०१० नंतर नियमितपणे इंटरनेटचा वापर करत आहेत. लोकांचा विश्वास कसा कमी झाला हे समजण्यासाठी दोन प्रकारच्या डेटाचा अभ्यास करण्यात आला. पहिल्या डेटा सेटमध्ये ११६ देशातील २२३२ क्षेत्रातील त्या लोकांवर अभ्यास करण्यात आला जे कमीत कमी ३जी मोबाइल इंटरनेटचा वापर करतात. यात २००७ पासून २०१८ पर्यंतच्या डेटाचा समावेश करण्यात आला. त्यानंतर यात दुसरा डेटा गॅलपच्या सर्व्हेचा वापर करण्यात आला. यात म्हटले आहे की, या दरम्यान या भागात लोकांचा कसा सरकार, न्यायालय, निवडणुकीवरील विश्वास बदलला. याचा निष्कर्ष असा निघाला की, जसे लोकांना ३जी इंटरनेट उपलब्ध होत गेले त्यांचा सरकारांवरील विश्वास कमी झाला.

अशा पद्धतीने पडला नकारात्मक प्रभाव

> क्षेत्रानुसार बोलायचे झाल्यास ग्रामीण भागात इंटरनेट आल्यानंतर सरकारांवरील अविश्वास वाढला आहे. शहरी भागात अविश्वास कमी वाढला आहे. कारण येथे आधीपासून इंटरनेट होते.

> ज्या देशांत इंटरनेट व वेब ब्राउझिंगवर जास्त प्रतिबंध नाहीत तेथे लोकांचा विश्वास जास्त कमी झाला आहे. ज्यांनी इंटरनेट सेन्सर केले आहे त्यांच्यावर परिणाम कमी झाला आहे.

> तेथे इंटरनेटमुळे विश्वासावर जास्त परिणाम झाला जेथे मीडियावर प्रतिबंध जास्त आहेत. जेथे माध्यमे स्वतंत्र आहेत, तेथे इंटरनेट आल्यानंतरही विश्वास जास्त घटला नाही.

3 जी डेटामुळे मतेही कमी झाली :

निवडणुकीतही ३ जी नेटवर्कचा परिणाम झाला. संशोधनात ३३ युरोपीय देशांतील १०२ निवडणुकांचा समावेश करण्यात आला. जसजसे ३जी नेटवर्क आले, सत्ताधारी पक्षांचा मतदानाचा वाटा जवळपास ४.७ टक्क्यांपर्यंत कमी झाला, असे यात दिसले.