आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवेत बाण:वास्तव लक्षात न घेता मस्क यांचे नुसतेच दावे, ड्रायव्हरलेस कार सहा वर्षांनंतरही आली नाही!

हवेत बाणएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील प्रसिद्ध उद्योगपती अॅलन मस्क यांच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह लावण्यास सुरुवात झाली आहे. ट्विटरच्या खरेदीनंतर त्यांनी केलेली वक्तव्ये त्यांना अडचणीत आणू शकतात. कारण त्यामुळे त्यांचे शेअरची प्रचंड घसरण झाली. कधी त्यांनी वाक् स्वातंत्र्याचा आग्रह धरणारे वक्तव्य करतात. कधी ते स्पॅम बॉट्सवर बंदीचे आग्रही मत मांडतात. तर कधी ते नफ्यात वाढ होईल, असा दावा करतात. या आश्वासनांमुळे त्यांना भलेही कंपनीचे संस्थापक जॅक डोर्सी यांचे शेअर मिळाले असतील परंतु कर्मचाऱ्यांसाठी या सर्व गाेष्टी एखाद्या दु:स्वप्नवत ठरू लागल्या आहेत. म्हणूनच मस्क यांचे अनेक सहकारी कंपनीत राहावे की नाही असा विचार करू लागले आहेत. सुरुवातीला मस्क यांनी चालकरहित कार असेल, असे म्हटले होते. टेस्लाचे भविष्यातील साॅफ्टवेअर स्वयंचलित स्वरूपाचे असतील, असा दावा मस्क यांनी २०१६ मध्ये केला होता. हे लक्षात घेऊन लाेकांनी हजारो डॉलर त्यांच्या कंपनीत गुंतवले. मस्क आपल्या टीमशी सल्लामसलत केल्या विनाच नव्या सुविधेबद्दलची घाेषणा करतात, असे त्यांच्याबद्दल सांगितले जाते. मस्क नव्या संधीसाेबत स्वत:ला महान करतात. टेस्ला कंपनीच्या प्राॅडक्शन हाऊसमध्ये ते झाेपले होते. परंतु स्वत:ला शिखराकडे नेण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी उचललेले हे पाऊल होते. कारण त्यांच्या उपस्थितीत उत्पादनात काही वाढ झाली नव्हती. उलट मालक तेथे असल्याने वाईट परिणाम दिसून आला.

महिला, अल्पसंख्याकांना चुकीची वागणूक
मस्क महिला व अल्पसंख्याक समुदायाला वेगवेगळी वागणूक देतात. कृष्णवर्णीय कर्मचाऱ्यांना शारीरिक श्रमासाठी पाठवले जाते. वर्णभेदाची वागणूक दिली जाते. ई-मेलवर आक्षेपार्ह भाषेचा वापर होतो. महिलांना चांगली वागणूक दिली जात नसल्याच्याही तक्रारी येतात.

बातम्या आणखी आहेत...