आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक्सिको विमानतळावर महिलेने घातला गोंधळ:चेक-इन स्टाफला मारहाण, फ्लाइट सुटल्याने होती नाराज

मेक्सिको4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिको विमानतळावर एमिरेट्स एअरलाइन्सच्या चेक-इन स्टाफला एका महिलेने मारहाण केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेची फ्लाइट सुटली होती. यामुळे ती चिडलेली होती. ही घटना 1 नोव्हेंबरची आहे. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

चेक-इन डेस्कवर आपली सुटकेसही फेकली

व्हिडिओमध्ये महिला ओरडताना दिसत आहे. त्यानंतर महिला चेक-इन कर्मचार्‍यांना मारहाण करते आणि तिची सुटकेस चेक-इन डेस्कवर फेकते. यादरम्यान तेथे उभ्या असलेल्या अन्य कर्मचाऱ्याने महिलेला थांबवण्यासाठी सुरक्षारक्षकाला बोलावले. गोंधळ घालण्यापूर्वी ती महिला काउंटरवरही चढली होती. मात्र, ही महिला कोणती फ्लाइट चुकली होती आणि ती कुठे जात होती हे कळू शकले नाही.

गेल्या महिन्यातही घडल्या अशा घटना

अलीकडच्या काही महिन्यांत जगभरातील प्रवाशांकडून अशा वर्तनाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ऑक्टोबरमध्ये एक अमेरिकन महिला केबिन क्रूवर ओरडताना आणि प्रवाशांवर पाण्याच्या बाटल्या फेकतानाचा व्हिडिओ समोर आला होता. ऑक्टोबरमध्ये इंडोनेशियामध्ये तुर्की एअरलाइन्सच्या फ्लाइटमधील एका प्रवाशाने मद्यधुंद फ्लाइट अटेंडंटशी भांडण केले होते. त्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते.

बातम्या आणखी आहेत...