आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लाेरिडा:अमेरिकेत महिलेने विवाहाच्या दाेनच दिवसांनी पतीच्या पहिल्या पत्नीला किडनी दान केली

फ्लाेरिडा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 20 वर्षांपूर्वी घटस्फाेट झालेल्या व्यक्तीचा 10 वर्षांच्या डेटनंतर विवाहाचा निर्णय

चित्रपटातील प्रसंग वाटावा अशी घटना अमेरिकेच्या फ्लाेरिडात घडली. एका महिलेने पतीच्या पहिल्या पत्नीला किडनी दान देऊन तिचे प्राण वाचवले. घटना फाेर्ट लाॅडर्डालेची आहे. मूत्रपिंड दान करणाऱ्या या महिलेचे नाव डेबी व्ही नील स्ट्रिकलँड आहे. विशेष म्हणजे विवाहाच्या केवळ दाेन दिवसांनंतर त्यांनी पतीच्या पहिल्या पत्नीला किडनी दान दिली. जिम व मायलेन यांचा २० वर्षांपूर्वी घटस्फाेट झाला. दाेघेही मुलांच्या संगाेपनात व्यग्र आहेत. डेबीने जिम यांना १० वर्षे डेट केले. त्यानंतर जिम यांच्याशी विवाह केला. तत्पूर्वी मुलांच्या विवाहामुळे व इतर काही कारणांमुळे त्यांचा विवाह पुढे ढकलला जात हाेता. त्याच काळात जिम यांची पहिली पत्नी मायलेन यांना मूत्रपिंडासंबंधी आजार झाला. हळूहळू आजार गंभीर हाेत गेला. आता मायलेन यांची किडनी केवळ ८ टक्के काम करत हाेती.

त्यांच्या अनेक नातेवाइकांनी मूत्रपिंड देण्याबद्दलची इच्छा व्यक्त केली. परंतु दान करण्यासारखी कुणाचीही आराेग्य स्थिती नव्हती. त्याच काळात जिम व डेबी विवाहाचे नियाेजन करत हाेते. तेव्हा जिम यांची मुलगीही आई हाेणार हाेती. मायलेन मृत्युपंथाला लागल्या हाेत्या. त्याबद्दल डेबीला माहिती मिळाली. तेव्हा डेबीने जिमला विश्वासात घेऊन किडनीचे दान करण्याची इच्छा व्यक्त केली. ६ मुलांची जबाबदारी सांभाळणाऱ्या डेबी म्हणाल्या, आता आम्ही किडनी सिस्टर्स आहोत. दाेघींच्या प्रकृतीत सुधारणा हाेत आहे. पहिल्या पत्नीला आजी हाेण्याचे सुख देण्याचा निर्णय

जिम व मायलेन यांची मुलगी आई हाेणार आहे. त्यात मायलेन यांचा मृत्यू झाल्यास त्यांना आजी हाेण्याचे सुख मिळणार नाही, ही गाेष्ट त्यांच्या मनाला व्यथा देणारी हाेती. त्यामुळे पुढे मुलीचे लग्न व पुढच्या आयुष्याचा विचार न करता डेबी यांनी निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...