आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंटल इमर्जन्सी:ब्रिटनमध्ये रुग्णालयात नंबर लावूनही दंतचिकित्सक भेटत नसल्याने महिलेने 13 दात स्वत:च काढले

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमध्ये डेंटल इमर्जन्सीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दंतचिकित्सकांच्या अभावी लोकांचे हाल होत आहेत. सुविधा मिळत नसल्याने लोकांना इतर दात वाचवण्यासाठी किडलेले दात स्वत:च काढण्याची वेळ आली आहे. असह्य वेदनांमुळे अनेक रुग्णांना आणीबाणीच्या स्थितीत रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. परंतु त्यानंतरही उपचार होत नसल्याचे वास्तव आहे. एका महिलेने वैतागून स्वत:चे 13 दात स्वत:च काढले.

ब्रिटनमधील सरकारी रुग्णालयात ही स्थिती दिसून येत आहे. सरकारी रुग्णालयात डेंटिस्टचा तुटवडा आहे. म्हणूनच रुग्णांना विना उपचार घरी परतावे लागत आहे. सामान्य नागरिक तपासणीसाठी नंबर तर लावू लागले आहेत. परंतु त्यानंतरही प्रत्यक्ष दंततज्ज्ञांची भेट होत नाही. त्यापैकी काही चिकित्सक म्हणाले, कोरोनाच्या काळात वेतनात कपात करण्यात आली. त्यामुळे गेल्या वर्षी 2 हजार डेंटिस्ट नोकरी सोडून गेले. दहा वर्षांपासून सरकारने दंतचिकित्सकांना वेतनाबाबत पुरेसे सहकार्य केले नाही. आता सरकार जागे झाले आहे.

तीन लाख दंतचिकित्सकांच्या नियुक्तीसाठी आरोग्य विभागाने 400 कोटी रुपयांची घोषणा केली. परंतु त्यावर लगेच अंमलबजावणी होऊ शकत नाही.ब्रिटनच्या एक लाख लोकांसाठी सरकारी रुग्णालयात केवळ 32 दंतचिकित्सक आहेत. दातांच्या असह्य वेदना घेऊन 30 लाखांहून जास्त रुग्णांना 64 किलोमीटरचा प्रवास करूनही उपचाराची सुविधा नाही. 2021 च्या आकडेवारीनुसार गरजूंपैकी 33 टक्के रुग्णांनाच सुविधा मिळाली.

पेन किलरसाठीदेखील खासगीत ३८ हजारांची मागणी

दातांवरील उपचारासाठी खासगी रुग्णालयात गेल्यावर उपचाराच्या आधीच १९ हजार रुपयांची मागणी केली जात आहे. औषधीच्या रूपाने केवळ पेनकिलरसाठी ३८ हजार रुपये वसूल केल्याचे काहींनी उघडपणे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...