आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब:महिलेची जीभ झाली काळी अन् उगवले केस, डॉक्टरही चक्रावले; अँटिबायोटिक्सचे दुष्परिणाम, कॅन्सरवर सुरू होते उपचार

लंडन24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका महिलेची जीभ काळी होऊन अचानक त्याच्यावर केस उगवल्याची विचित्र घटना घडली आहे. ब्रिटीश मेडिकल जर्नलच्या केस रिपोर्ट्सनुसार, सदर 60 वर्षीय महिलेला रेक्टर कॅन्सर अर्थात पोटाचा कर्करोग होता. जपानमध्ये 14 महिन्यांपूर्वी तिच्यावर उपचार सुरू झाले होते. महिला आपल्यावरील कीमोथेरेपीचे एडव्हर्स इफेक्ट कमी करण्यासाठी मायनोसायक्लिन घेत होती. त्याचा वापर पुरळांपासून न्यूमोनियापर्यंत सर्व गोष्टींवरील उपचारात केला जातो.

डॉक्टरांनी नोंदवले की, पॅनिटुमुमॅब - प्रेरित त्वचेच्या जखमांना प्रतिबंध करण्यासाठी महिलेला 100 मिग्रॅ/दिवस मायनोसायक्लिन देण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच त्याच्या रिअॅक्शनमुळे महिलेची जीभ काळी पडून त्यावर केस उगवल्याचे आमच्या निदर्शनास आले. अँटिबायोटिक रिअॅक्शनमुळे महिला 'ब्लॅक हेअरी टंग (बीएचटी)'ला बळी पडली. या प्रकरणी केवळ महिलेची जीभ काळी पडली नाही, तर तिच्या त्वचेचा रंगही राखाडा झाला.

द मेट्रोच्या वृत्तानुसार, सर्वप्रथम डॉक्टरांच्या लक्षात आले की, महिलेचा चेहरा राखाडी झाला. त्यानंतर त्या महिलेने आपले तोंड उघडून आपली जीभ दाखवली तेव्हा त्यानंतर आश्चर्याचा धक्का बसला. कारण, त्या महिलेच्या जिभेचा रंग काळा झाला होता. तसेच त्याच्यावर केसही उगवल्याचे दिसून येत होते. डॉक्टरांनी सांगितले की, या सर्व प्रकारानंतर आम्ही महिलेची औषधे बदलली. त्यानंतर आता तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेतही घडली होती अशी घटना

विशेष म्हणजे गतवर्षी अमेरिकेतही असेच एक प्रकरण उजेडात आले होते. तिथे एका व्यक्तीला समजले की, आपल्या जिभेत एक वेगळाच बदल होत आहे. जिभेवर केस वाढले आहेत. ते अधिक काळे होत आहेत. मध्यभागी पिवळ्या रंगाचा प्रभाव आहे. पण त्याला कोणताही त्रास जाणवत नाही. ही धक्कादायक स्थिती पाहून त्या 50 वर्षीय व्यक्तीच्या नातेवाईकांसह डॉक्टरांना सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. जिभेच्या वरच्या बाजूला काळ्या रंगाचा जाड थर दिसत होता. पिवळ्या रंगाचा प्रभाव जिभेच्या मध्यभागी व मागील बाजूस होता.

हा आजार सहन करणे अवघड

यासंबंधीचा शोधनिबंध JAMA Dermatology जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. डॉक्टरांनी या जिभेचा अभ्यास करून त्याची माहिती या जर्नलमध्ये प्रकाशित केली होती. डॉक्टरांनी सांगितले की, ही व्यक्ती ब्लॅक हेअरी टंग सिंड्रोमने ग्रस्त होती. हे नाव सर्जनशील असू शकते. पण हा रोग दिसणे व सहन करणे अत्यंत वेदनादायी आहे. हा रोग प्रतिजैविकांच्या दुष्परिणामांमुळे होऊ शकतो. किंवा तोंडातील घाण, कोरडे तोंड, धूम्रपान किंवा मऊ अन्न खाण्यामुळे होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.