आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेतील एका महिलेने 37 हजार फुट उंचीवर विमानाचे दार उघडण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. तिच्या या कृत्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यानंतर पोलिसांनी महिलेला अटक केली.
महिलेने विमानाचे दार उघडण्याचा प्रयत्न का केला याचे कारण ऐकून लोक हैराण झाले. महिला म्हणाली की, तिला जीजसने असे करायला सांगितले होते. ही घटना 26 नोव्हेंबरची असल्याचे सांगितले जात आहे. अलिकडेच पोलिसांनी या घटनेची माहिती अमेरिकेतील जिल्हा न्यायालयात दिली आहे. यानंतर या घटनेचा खुलासा झाला.
प्रवाशांनी महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला
एक पोलिस अधिकारी म्हणाले - साऊथवेस्ट फ्लाईट 192 टेक्सासच्या ह्युस्टन शहराकडून ओहिओतील कोलंबसकडे जात होती. यातून प्रवास करणाऱ्या 34 वर्षीय अॅलोम एगबेग्निनोंनी अचानकच दार उघडण्याचा प्रयत्न सुरु केला. एका प्रवाशाने पाहिल्यावर त्याने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. फ्लाईट अटेंडंटने जेव्हा विचारले की ती असे का करत आहे, तेव्हा ती महिला म्हणाली की जीजसने तिला असे करायला सांगितले आहे.
महिला रागात होती
कोर्टात पोलिसांनी सांगितले की - महिला अचानकच तिच्या सीटवरून उठून विमानाच्या दरवाजाकडे जायला लागली. हे पाहून एका अटेंडंटने तिला बसायला सांगितले. त्यानंतर महिलेने एक्झिट डोअरवरील खिडकीतून बाहेर डोकावण्याची विनंती केली. अटेंडंटने नकार दिल्यावर तिला राग आला. ती बळजबरी दरवाजाचे हँडल पकडून ते ओढायला लागली. तेव्हा विमान 37 हजार फुट उंचीवरून उडत होते.
प्रवाशांसोबत हुज्जत
फ्लाईट अटेंडंटसोबत महिलेचा वाद होत असल्याचे पाहून काही प्रवासी ओरडायला लागले. महिला दार उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी विमानातील सर्व प्रवासी घाबरले. यादरम्यान एका प्राशाने महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. दोघेही विमानाच्या फ्लोअरवर पडले. यादरम्यान महिलेने तिला रोखणाऱ्या व्यक्तीच्या मांडीला चावा घेतला. त्यानंतर त्या व्यक्तीने महिलेच्या बोटांना चावा घेतला. यावेळी ती महिला विमानाच्या फ्लोअरवर डोकेही आदळत होती.
महिलेकडे कोणतेही सामान नव्हते
पोलिस म्हणाले - महिला पतीला न सांगता घरातून निघून आलेली होती. विमानात तिच्यासोबत कोणतेही सामान नव्हते. चौकशीदरम्यान ती म्हणाली की, तिला श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून ती जागेवरून उठली होती. तिला अस्वस्थ वाटत होते म्हणून ती म्हणाली की जीजसने तिला दार उघडायला सांगितले. महिला असेही म्हणाली की ती नॉर्मल असती तर तिने असे केले नसते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.