आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Women Better For Space Missions; Consumes 26% Less Calories, 18% Less Water Than Men, Saving 1300 Crores

संशोधकांचा सल्ला:अंतराळ मोहिमेसाठी महिला उत्तम; पुरुषांपेक्षा 26% कमी कॅलरी, 18% कमी पाणी लागते, १३०० कोटींची बचत

वृत्तसंस्था | बर्लिन (जर्मनी)18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांनी पृथ्वीवर आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. त्या कोणत्याही बाबतीत पुरुषांपेक्षा कमी नाहीत. आता अंतराळातही त्यांचा दबदबा राहणार आहे. दीर्घकाळाच्या अंतराळ मोहिमेवर पुरुषांऐवजी महिला अंतराळवीरांना पाठवणे उत्तम व किफायतशीर ठरेल, यावर आता विज्ञानानेही शिक्कामोर्तब केले आहे. महिला क्रूला अत्यंत कमी संसाधनांची गरज असते, असा दावा युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ईएसए) जर्मनी येथील संशोधकांनी आपल्या संशोधनातून केला आहे. मंगळावर पाऊल टाकणारे पहिले पथक महिलांचे असले पाहिजे, असा सल्ला संशोधक टीमने दिला आहे.

टीममधील शास्त्रज्ञांच्या मते, महिला अंतराळवीराला पुरुषांच्या तुलनेत सरासरी २६% कमी कॅलोरी, २९% कमी ऑक्सिजन व १८% कमी पाण्याची गरज असते. यामुळे मोठी बचत होऊ शकते. चार महिलांच्या १,०८० दिवसांच्या अंतराळ मोहिमेस एका ऑल मेल मिशनच्या तुलनेत १,६९५ किलो अन्न कमी लागते. नासाच्या मते, आयएसएसमध्ये पेलोड आणण्याचा खर्च ७६.३८ लाख रुपये किलो आहे. या मोहिमेत बदल केल्यास थेटपणे सुमारे १३०० कोटी रुपयांची बचत केली जाऊ शकते. संशोधनामध्ये म्हटले आहे की, मानसशास्त्रीय कारणांनीही महिला दीर्घ मोहिमेसाठी अनुकूल ठरू शकतात. आकडेवारीनुसार, महिलांच्या गटांची परस्पर अडचणी सोडवण्यासाठी संघर्षविरहित दृष्टिकोन स्वीकारण्याची अधिक शक्यता असते. निश्चितपणे कुणाच्याही मदतीविना त्या प्रत्येक स्थितीचा सामना करू शकतात. या मोहिमेत अंतराळवीरांना २-३ वर्षांपर्यंत एकमेकांसोबत राहावे लागेल. शास्त्रज्ञांनी काढलेल्या निष्कर्षानुसार, अंतराळात फिट राहण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा ३०-३० मिनिटांचा एरोबिक व्यायाम (काउंटरमेजर एक्सरसाइज) केला जातो. यामध्येही शरीरानुसार ऑक्सीजन आणि रिहायड्रेट होण्यासाठी अधिक पाण्याची आवश्यकता असते. याबाबतीतही महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

केवळ १२% महिला अंतराळवीर पोहोचल्या अंतराळात : ईएसए
अंतराळात आतापर्यंत ६२२ अंतराळवीरांना पाठवण्यात आले. त्यात महिलांची संख्या केवळ ७२ आहे. म्हणजे १२% पेक्षाही कमी. मेच्या अखेरिस सौदी अरेबियाची पहिली महिला अंतराळवीर रेयाना बरनावी आयएसएसला जाईल. नासाने सांगितले होते की, तिच्या चांद्र मोहिमेत प्रथमच क्रूसोबत महिला अंतराळवीर क्रिस्टिना कोचही असेल. संशोधकांनुसार, असे बदलच भविष्यात महिलांच्या मोहिमेचा मार्ग मोकळा करतील.