आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संयुक्त राष्ट्र:शांती चर्चांपासून महिला 20 वर्षांनंतरही वंचित : यूएन

संयुक्त राष्ट्रएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दहशतवादी संघटनांवर बंदी घाला : भारत

शांतताविषयक चर्चांमध्ये पुरुष प्रतिनिधींचा सहभाग असलेला आपण पाहताे. परंतु, वीस वर्षांनंतरही महिलांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले आहे. त्यांना समान भागीदारी मिळू शकलेली नाही. संयुक्त राष्ट्रात महिलांसंबंधी विभागाच्या कार्यकारी संचालक फुमजिले म्लाम्बाे नगकुका यांनी सुरक्षा परिषदेला ही माहिती दिली. नगकुका म्हणाल्या, शांती चर्चेत महिलांना समान भागीदारीचा प्रस्ताव २००० मध्ये पारित झाला हाेता. त्यावर अजूनपर्यंत अंमलबजावणी हाेऊ शकलेली नाही. महिलांना अशा चर्चेत सहभागी हाेण्यापासून जाणूनबुजून बाजूला सारले जात आहे. १९९२ ते २०१९ पर्यंत केवळ १३ टक्के महिला शांती चर्चेत वार्ताकार म्हणून सहभागी झाल्या. त्यापैकी ६ टक्के महिलांनी यशस्वी मध्यस्थी केली, तर ६ टक्के महिलांना करारावर स्वाक्षरी करण्याची संधी मिळाली. इतर वार्ताकारांनी महिलांच्या एेवजी हिंसाचाराला प्राेत्साहन देणाऱ्या घटकांना बळ देण्याचे काम केले.

दहशतवादी संघटनांवर बंदी घाला : भारत
भारताने सुरक्षा परिषदेत महिला सुरक्षेबाबत खुल्या चर्चेत भूमिका मांडली. महिलांच्या विरोधात होणारा हिंसाचार सभ्य समाजाचा पाया नष्ट करणारा ठरतो. म्हणूनच सुरक्षा परिषदेने महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांत सामील दहशतवादी संघटनांवर बंदी घालावी. संघर्ष व मानवनिर्मित संकटांनी महिलांना प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करण्यापासून रोखले आहे. कोरोनामुळे युद्धग्रस्त क्षेत्रातील महिलांवर मोठे संकट आेढवले आहे.

‘पारित प्रस्ताव लहान क्रांती, आम्हाला प्रगती करायचीये’
जर्मनीच्या परराष्ट्र राज्यमंत्री मिशेल मुंटेफेरिंग म्हणाल्या, शांती चर्चांमध्ये महिलांना समान भागीदारी देण्याचा प्रस्ताव छोट्या स्वरूपाचा आहे. आपण त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. लैंगिंक हिंसाचार रोखण्यासाठी कडक शिक्षा असायला हवी. अतिशय कठीण परिस्थितीत पारित झालेल्या सुरक्षा परिषदेच्या नऊ प्रस्तावांनंतरही महिलांना अजूनही शांती चर्चेतील भागीदारी देण्यापासून वंचित ठेवले जात आहे. संघर्ष संपल्यानंतरही त्यांना त्यांच्या हक्कापासून उपेक्षित ठेवले जात आहे.

केवळ ७ % देशांचे नेतृत्व महिलांच्या हाती : गुटेरस
संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीस अँटोनियो गुटेरस म्हणाले, केवळ ७ टक्के देशांचे नेतृत्व महिलांकडे आहे. मात्र महिलांना शांती चर्चेच्या प्रतिनिधी मंडळापासून बाहेर ठेवले जात आहे.