आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Women Doctors And Nurses In Maternity Hospitals In Afghanistan Are Not Paid By The Taliban, Yet They Come From 50 Km To Work, Women Medical Staff Leave The House In Burqas

दिव्य मराठी विशेष:अफगाणिस्तानात महिला डॉक्टर-नर्सना तालिबानकडून वेतन नाही, तरीही 50 किमीवरून येतात कामावर

काबूल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारने नुकतेच सर्व महिलांना बुरखा परिधान करणे अनिवार्य करण्याचे फर्मान काढले आहे. सरकारी नोकऱ्यांत मोजक्याच महिला उरल्या आहेत.

खासगीत तर महिला नसल्यात जमा आहेत. परंतु प्रसूती रुग्णालयांत काम करणाऱ्या महिला डॉक्टर आणि परिचारिकांना सरकारकडून वेतन दिले जात नाही. तरीही महिला डॉक्टर आणि परिचारिका आपले काम करण्यात कसूर करत नाहीत. अनेक महिन्यांपासून त्या विनावेतन काम करत आहेत. ३१ वर्षीय डॉक्टर फैजली म्हणाल्या की, मागील आगस्टनंतर परिस्थिती खूप बिघडली आहे. देशात अशांततेमुळे त्यांना घरातून बाहेर पडण्याची भीती वाटत होती. परंतु रुग्णालयात प्रसूतीचे काम करणे त्यांनी टाळले नाही. त्यांनी सांगितले की, काबूलमधील सर्वात मोठ्या प्रसूती रुग्णालयात त्या आणि त्यांचा बहुतांश महिला स्टाफ आहे. हे रुग्णालय ५० किमी अंतरावर आहे. तरीही त्या कामावर येतात. त्यांना येण्यासाठी साधन मिळत नाही. कोणत्याही प्रकारे स्टाफने सार्वजनिक वाहनाची व्यवस्था केली. त्या सगळ्या जणी यातच बसून येतात. घरातून बाहेर पडताना सर्व जणी बुरख्यात निघतात.

रुग्णालयात पोहोचल्यानंतर कपडे बदलतात. जागोजागी तालिबानी पोलिस त्यांची तपासणी करतात. त्यांनी व्यवस्थित बुरखा परिधान केला की नाही, हे तपासले जाते. एका दुसऱ्या रुग्णालयात काम करणारी महिला डॉक्टर मकसुदी यांनी सांगितले की, त्यांच्या रुग्णालयात दररोज १०० प्रसूती होतात.त्यांनी सांगितले की, इतक्या मोठ्या संख्येने प्रसूती होत असताना तालिबान सरकारकडून कोणतेही औषध किंवा सर्जिकल उपकरण दिले जात नाही. रात्री उशिरापर्यंत मॅटर्निटी रुग्णालयात थांबावे लागत असतानाही तालिबानी सरकारकडून सुरक्षेची कोणतीही व्यवस्था केली जात नाही.

अनेक महिला डॉक्टर व नर्स देश सोडून पाश्चात्त्य देशांत गेल्या
तालिबानने सत्ता बळकावल्यानंतर अनेक महिला डॉक्टर आणि परिचारिका अफगाणिस्तान सोडून अमेरिका, कॅनडा आणि इतर पाश्चात्त्य देशांत निघून गेल्या. यादरम्यान याच वर्षी जानेवारीपासून आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसने अफगणिस्तानच्या महिला डॉक्टर आणि नर्सेसना वेतन आणि इतर भत्ते देणे सुरू केले.

बातम्या आणखी आहेत...