आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Women Get Land Rights Through Solidarity, Male Monopoly On 98% Of Land In Kenya's Population Of 5.49 Crore

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​एकजुटीतून महिलांना मिळाला जमिनीचा हक्क, 5.49 कोटी लोकसंख्येच्या केनियात 98 टक्के जमिनीवर पुरुषांची मक्तेदारी

नैरोबी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उमोजा गावातील महिला क्रांतीमुळे परंपरेला छेद

आफ्रिकन देश केनियातील लोकसंख्या ५.४९ काेटी आहे. त्यात ४९.४ टक्के पुरुष तर ५०.१ टक्के महिला आहेत. असे असूनही देशातील ९८ टक्के जमीन पुरुषांच्या नावे आहे. परंतु केवळ ५३ महिलांची संख्या असलेल्या उमाेजा गावामुळे शेकडो वर्षांच्या या परंपरेला फाटा देण्यात आला. आता महिलांचाही जमिनीवर हक्क असेल. ३० वर्षांपूर्वी बनलेल्या उमाेजा गावात केवळ महिलाच राहतात. येथे सुमारे ५३ महिला व २०० मुले आहेत. गाव साकारण्याची कहाणीदेखील वेदनादायी आहे.

उत्तर केनियात राहणाऱ्या जेन नाेलमाँगन यांच्यावर ३० वर्षांपूर्वी एक ब्रिटिश सैनिकाने अत्याचार केला हाेता. त्यानंतर पतीने जेनला घराबाहेर काढले. पुढे सुरक्षित ठिकाण शाेधताना त्या आपल्या ८ मुलांसह पुरुष नसलेल्या गावात राहायला आल्या. १९९० मध्ये सांबरू महिलांसाठी छावणी असे या गावाची प्राथमिक स्वरूप होते. उमाेजा गावात लैंगिक शोषण झालेल्या महिलांपासून परित्यक्ता, संपत्तीतून बेदखल केलेल्या तसेच बालविवाह झालेल्या महिला राहतात.

हळूहळू अशा महिलांची संख्या वाढली. पुढे या महिलांनी उदरनिर्वाहासाठी आणि मुलांच्या पालनपाेषणासाठी शेती सुरू केली. तीन दशकांपासून त्या शेती करतात. ५२ वर्षीय जेन म्हणाल्या, हे गाव आमचा आधार आहे. जीवन सुधारण्यासाठी आम्ही मिळून-मिसळून काम केले. परस्परांना महिला हक्काचे महत्त्व पटवून दिले. हेन्री लेनायासा प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांच्या अखत्यारीत उमाेजा गाव येते. त्या महिलांना जमिनीवर पुरुषांएवढाच हक्क असल्याचे सांगतात. त्यासाठी जनजागृतीही करतात. त्यासाठी उमाेजा गावाचे उदाहरण देतात.

केनियाचा कायदा आधीपासूनच देशातील प्रत्येक नागरिकाला संपत्तीत बराेबरीचा हक्क देताे. परंतु पारंपरिक रूपाने वडिलांकडून केवळ मुलांचे नावे केला जाताे. महिलांच्या नावे काही हाेत नाही. परंतु उमाेजातील महिला कायद्याने जमिनीवरील हक्क सांगू शकतील. त्यांनी अनेक वर्षांची बचत व दानातून शेतजमीन खरेदी केली. पुढील महिन्यात जेन यांना एका शेताचा मालकी हक्क मिळेल.

घर, शाळा, रुग्णालये महिलांनीच उभारली
स्वाहिली भाषेत उमाेजा याचा अर्थ एकजूट. रेबेका लाेलाेसाेली नावाच्या महिलेने त्याची सुरुवात केली हाेती. महिलांच्या खतनेस विराेध केल्यावरून पुरुषांच्या एका गटाने रेबेका यांच्यावर हल्ला केला हाेता. उपचार सुरू असतानाच त्यांना स्वतंत्र गावाची कल्पना मनात आली. सुरुवातीला १५ महिला या गावात राहू लागल्या.

महिलांनी स्वत:च घरे, शाळा, रुग्णालयांचे बांधकाम केले. महिला मध, हस्तकलेच्या वस्तू िवकूनही उदरनिर्वाह करतात. जेन यांनी तर मुलांना शिक्षण देऊन सक्षम केले. त्यांचा एक मुलगा पाेलिस खात्यात आहे. मुलगी पत्रकार झाली आहे. ती इतरांना आपल्या हक्कांबाबत जागरूक करते.

बातम्या आणखी आहेत...