आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्कमेनिस्तान:महिलांना नोकरी करण्यापूर्वी भरून द्यावा लागेल मेकअप बाँड, कॉलेज-कार्यालयांत पोलिस सज्ज

अश्गाबात20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोव्हिएत संघात राहिलेला मध्य आशियातील तुर्कमेनिस्तान आता कट्टरतेकडे वेगाने वाटचाल करत आहे. इथे महिलांच्या ड्रेसवर आणि सौंदर्य प्रसाधनांच्या वापरावर बंदी घातली आहे. यासाठी सरकारने सर्व सलूनवर नियंत्रण ठेवत ब्यूटी सर्व्हिसवर निर्बंध लावले आहेत.

एखाद्या संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी महिलांनी ‘बालाक’ (एकाच रंगाच्या रेशनी पँटसारखा दिसणारा सूट) घातले की नाही, हे पाहिल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जाईल. निर्बंधांचे पालन करण्यासाठी पोलिसदेखील सज्ज ठेवले आहेत. महिलांना नोकरी देण्यापूर्वी त्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करणार नाहीत, केस रंगवणार नाहीत, मेनिक्योर करणार नाही, स्कीन टाइट कपडे घालणार नाही आणि बोटोक्ससारखे इंजेक्शन घेणार नाहीत, अशा प्रकारचे शपथपत्र त्यांच्याकडून भरून घेतले जात आहे. सर्व महिलांना तेथील पारंपरिक ड्रेसच्या रूपात बालाक घालणे बंधनकारक केले आहे. नियमांचे पालन न केल्यास त्यांना नोकरीवरून काढले जाईल. तुर्कमेनिस्तानच्या महिला अशा प्रकारच्या कठीण निर्बंधांचे पालन करण्यासाठी लाचार आहेत. कारण याचा विरोध केल्यास त्यांना समाजाप्रती जबाबदार मानले जाणार नाही आणि नोकरी दिली जाणार नाही. त्यांना देशद्रोही ठरवले जाऊ शकते. शाळा आणि विद्यापीठांत हजेरी लावण्यापूर्वी ड्रेसकोड पाहण्याचे निर्देशही दिले आहेत. असे न केल्यास चौकशीसाठी पोलिस ठाण्यात जावे लागेल.

घटनेतील समानतेच्या अधिकारानंतरही घेतला हा निर्णय
तुर्कमेनिस्तान घटनेच्या कलम १६ मधील २६४व्या पोट कलमात समानतेचा अधिकार दिला आहे. यात महिलांना सरकारच्या व्यवस्थापनात भाग घेण्याचा समान अधिकार आहे. तरीही पोलिसांसाठी महिलांचा परिधान प्राथमिक विषय आहे.

बातम्या आणखी आहेत...