आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत प्रतिस्पर्धीपणाची भावना जास्त असते. इव्हॅल्युशनरी बिहेव्हियरल सायन्सेस या नियतकालिकात प्रकाशित संशाेधन अहवालानुसार जास्त संधी असलेल्या क्षेत्रात महिला आपापसात जास्त स्पर्धा करू लागतात. पुरुषांच्या तुलनेत त्या महिलांनाच आपल्या प्रतिस्पर्धी मानतात. परंतु प्रगती करण्याची संधी कमी असल्यास महिला आपापसातील प्रतिस्पर्धा साेडून पुरुषांना आपले प्रतिस्पर्धी मानतात. पुरुषांसाेबत असे हाेत नसल्याचा दावा संशाेधनातून करण्यात आला आहे.
या विषयात संशाेधन करणाऱ्या टेक्सास ख्रिश्चन युनिव्हर्सिटीच्या संशाेधक हानाह के ब्राॅडशा म्हणाल्या, महिलांमधील स्पर्धा पुरुषांमधील स्पर्धेच्या तुलनेत वेगळी असते. महिला स्पर्धा जिंकण्यासाठी अप्रत्यक्ष पद्धतींवर जास्त भर देतात. उदाहरणार्थ आपल्या प्रतिस्पर्ध्याविषयी अफवा पसरवणे किंवा त्याला समाजात वेगळे पाडणे. साेबतच महिला आपापसांतील स्पर्धेला लपवतात. एखाद्यासाेबत आपली स्पर्धा आहे, ही बाब त्या जाहीरपणे स्वीकारतदेखील नाहीत. राेमँटिग जाेडीदार, आर्थिक-भाैतिक साधने किंवा इतर एखादे यश याबद्दल त्या बाेलत नाहीत.
जास्त किंवा कमी संधीमुळे स्पर्धकाबद्दल मानसिकता बदलते
{अध्ययन-१- पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये संधीच्या कमतरतेची परिस्थिती तयार करून त्यांना प्रश्न विचारले. यातून महिला व पुरुषांत स्पर्धा वाढेल, असे त्यांनी मान्य केले.
{अध्ययन २- पदवीचे शिक्षण घेणाऱ्या २३६ विद्यार्थी-विद्यार्थिनींना ४ पुरुष व ४ महिलांची चित्रे दाखवली गेली. जास्त संधी असल्यास काेण काेणासाेबत स्पर्धा करू लागेल, याबद्दल त्यांना अंदाज लावण्यास सांगण्यात आले. महिला आपापसांतच स्पर्धा करतील, असे विद्यार्थिनींचे मत हाेते.
{अध्ययन -३ - ११९ विद्यार्थिनींचे दाेन गट केले. मग एका गटाकडून अर्थव्यवस्थेची दुर्दशा, घटणारी संधी तर दुसऱ्या गटाकडून चांगली अर्थव्यवस्था व जास्त संधींचे कारण जाणून घेण्यात आले. त्यातही महिला आपसांतच जास्त स्पर्धा करतील.
{अध्ययन-४- विद्यार्थिनींना चांगल्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगण्यात आले. त्यानंतर काही प्रश्न विचारले. चांगल्या आर्थिक परिस्थितीत महिला परस्परांना प्रतिस्पर्धी मानतात, असे त्यांच्या निष्कर्षातून स्पष्ट झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.