आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी विशेष:साेशल मीडियावर जास्त वेळ घालवणाऱ्या महिला, माता तुलना करत असल्याने तणाव, संतापात वाढ

वाॅशिंग्टन22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेशल मीडियात काेणतीही गाेष्ट काही मिनिटांत व्हायरल हाेते. गराेदरपणात किंवा प्रसूतीनंतरची छायाचित्रे महिला साेशल मीडियावर पाेस्ट करतात आणि इतरांशी तुलना करू लागतात. अशा प्रकारे साेशल मीडियावर जास्त वेळ घालवणाऱ्या मातांमध्ये तणाव वाढत असल्याचे दिसून आले आहे.

साेशल मीडियात मातृत्व आणि पालकत्वाबाबतचा आशय जास्त प्रमाणात शाेधणाऱ्या महिलांमध्ये तणाव वाढताे. बायाेलाॅजिकल सायकाॅलाॅजीमध्ये प्रकाशित लेखात तुलना केल्याने मातांमध्ये स्वत:विषयी नकारात्मकता वाढीस लागते, असा दावा करण्यात आला आहे. यातून त्यांच्यात भीतीची भावना निर्माण हाेते. यातून शरीरात काॅर्टिसाेल नावाच्या स्ट्रेस हार्माेनचा स्राव जास्त प्रमाणात हाेताे.

साेशल सेल्फ प्रिझर्व्हेशनच्या सिद्धांतानुसार एखाद्या सामाजिक स्थितीमुळे व्यक्ती स्वत:वरील विश्वास गमावताे. तेव्हा हायपाेथॅलेमिक पिट्युटरी अॅड्रिनल अॅक्सिस सक्रिय हाेते. संशाेधकांनी त्यासाठी ३४ वर्षांच्या काही मातांचा अभ्यास केला. अशा माता आठवड्यातील सहा दिवस साेशल मीडियावर मातृत्वासंबंधीचा आशय शाेधणे पसंत करतात.

चार दिवस चाललेल्या पाहणीत साेशल मीडियावर जास्त वेळ राहणाऱ्या महिलांच्या लाळेचाही अभ्यास करण्यात आला. त्यात काॅर्टिसाेलची पातळी जास्त आढळून आली. अशा मातांनी साेशल मीडियावरून अशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू नये. असा आशय त्यांनी टाळायला हवा, असे संशाेधकांना वाटते.

जास्त काॅर्टिसाेलमुळे माता-बालकांवर वाईट परिणाम
जाेसेफ व त्यांचे सहकारी म्हणाले, शरीरात जास्त प्रमाणात काॅर्टिसाेलचे उत्सर्जन झाल्याने त्याचा मातांच्या शरीरावर वाईट परिणाम हाेताे. नवजात बाळांवरही नकारात्मक परिणाम हाेताे. कारण त्यामुळे मुलांमध्येही या हार्माेनची पातळी वाढते.

बातम्या आणखी आहेत...