आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राउन प्रिन्स MBS सौदीचे नवे पंतप्रधान:सुधारणावादी नेते म्हणून ओळख, महिलांना दिला गाडी चालविण्याचा अधिकार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अजीझ यांनी 37 वर्षीय क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (MBS) यांना पंतप्रधान केले आहे. मंगळवारी जारी केलेल्या शाही फर्मानामध्ये राजाने धाकटा मुलगा प्रिन्स खालिद बिन सलमान यांची संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.

आणखी दोन महत्त्वाच्या नियुक्त्याही झाल्या आहेत. प्रिन्स तुर्की बिन मोहम्मद बिन फहद बिन अब्दुल अझीझ यांना राज्यमंत्री आणि प्रिन्स अब्दुलअजीज बिन तुर्की बिन फैसल यांना क्रीडामंत्री बनवण्यात आले आहे. या आधी MBS संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत असले तरी प्रत्यक्षात राजे सलमान यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते अनेक वर्षांपासून सौदीचे अघोषित शासकच होते.

या पदांवर कोणताही बदल नाही

प्रिन्स फैसल बिन फरहान अल सौद हे परराष्ट्र मंत्री, मोहम्मद अल-जदान अर्थमंत्री आणि खालिद अल-फलिह गुंतवणूक मंत्री म्हणून कायम राहतील.

किंग सलमान बिन अब्दुल अझीझ 2015 मध्ये सौदी अरेबियाचे पंतप्रधान झाले, आता त्यांनी मोठा मुलगा मोहम्मद बिन सलमानला पंतप्रधान केले आहे.
किंग सलमान बिन अब्दुल अझीझ 2015 मध्ये सौदी अरेबियाचे पंतप्रधान झाले, आता त्यांनी मोठा मुलगा मोहम्मद बिन सलमानला पंतप्रधान केले आहे.

राजाची प्रकृत्ती योग्य नसल्याने निर्णय

घोषणेनंतर, MBS यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सौदी अरेबियाने संरक्षण उद्योगात आत्मनिर्भरता 2% वरून 15% पर्यंत वाढवली आहे. नवे संरक्षण मंत्री ते 50% पर्यंत नेण्याचा प्रयत्न करतील.

86 वर्षीय राजे सलमान 2015 मध्ये शासक बनले, परंतु त्यापूर्वी त्यांनी प्रिन्स सलमानप्रमाणेच सुमारे अडीच वर्षे क्राऊन प्रिन्स म्हणून काम केले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांची प्रकृती ठीक नाही. तेव्हापासून MBS पंतप्रधान होण्याची चर्चा सुरू होती.

या वर्षातही राजाला दोन वेळा रुग्णालयात दाखल करावे लागले. नुकतेच, मे महिन्यात त्यांना आठवडाभर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यादरम्यान कोलोनोस्कोपीसह अनेक तपासण्या करण्यात आल्या होत्या.

तथापि, मंत्रिमंडळाच्या बैठकांचे अध्यक्षपदी किंग सलमानच

2018 मध्ये, क्राउन प्रिन्सने सौदी अरेबियामध्ये महिलांच्या ड्रायव्हिंगवरील बंदी उठवली. सौदी हा जगातील एकमेव देश होता जिथे महिलांना गाडी चालवता येत नव्हती.
2018 मध्ये, क्राउन प्रिन्सने सौदी अरेबियामध्ये महिलांच्या ड्रायव्हिंगवरील बंदी उठवली. सौदी हा जगातील एकमेव देश होता जिथे महिलांना गाडी चालवता येत नव्हती.

MBS सत्तेत आल्यानंतर अनेक बदल

MBS यांनी संरक्षण मंत्री म्हणून 2015 मध्ये राजकारणात प्रवेश केला. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी येमेनमधील इराण समर्थित हूती बंडखोरांवर जोरदार लष्करी कारवाई केली. यानंतर एप्रिल 2016 मध्ये व्हिजन 2030 लाँच करण्यात आले. सौदीला अरब आणि इस्लामिक देशांची सर्वात मोठी शक्ती बनवणे हा त्यांचा उद्देश आहे. याअंतर्गत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.

यातील सर्वात महत्त्वाची अर्थव्यवस्था आहे. खरे तर, व्हिजन 2030 चे पहिले उद्दिष्ट सौदीला तेलावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेपासून स्वतंत्र्य करणे आणि ते पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणे आहे. देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी त्यांनी निओम सिटीसारखे अनेक प्रकल्प सुरू केले आहेत.

सौदीचे चित्र बदलण्याचा प्रयत्न

2016 पासून MBS देशाचे महत्त्वाचे निर्णय घेत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना सौदीचे चित्र बदलायचे आहे, हे त्यांच्या निर्णयांवरून स्पष्ट होते. MBS ने 2018 मध्ये महिलांना ड्रायव्हिंगचा अधिकार दिला होता, आता त्यांना मतदानाचा अधिकारही देण्यात आला आहे.

MBS यांनी कट्टरतावादी गट, मौलवी आणि त्यांचे फतव्यांच्या हस्तक्षेपास कठोरपणे प्रतिबंधित केले आहे. धार्मिक पोलिसांसारख्या संस्कृतीला पाठीशी घालून ते देशात पॉप कल्चरला चालना देत आहेत. सौदी अरेबिया आता हाय-प्रोफाइल हेवीवेट बॉक्सिंग सामन्यांसह इतर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करत आहे.

2017 मध्ये, त्यांनी रियाधमधील रिट्झ-कार्लटन हॉटेलमध्ये भ्रष्टाचार प्रकरणी 200 राजपुत्र आणि व्यावसायिकांना ताब्यात घेतल्यानंतर सत्तेवर आपली पकड मजबूत केली होती.

अनेक वादांची देखील पार्श्वभूमी

MBS वर त्यांच्या टीकाकारांना तुरुंगात टाकल्याचा आरोप आहे. इस्तंबूलमधील सौदी अरेबियाच्या वाणिज्य दूतावासात पत्रकार जमाल खशोग्गी यांच्या हत्येप्रकरणी 2018 मध्ये MBS यांची प्रतिमाही डागाळली होती. पत्रकार जमाल सौदी एमबीएसच्या धोरणांना विरोध करत होते, त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती.

या हत्येमागे MBS यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी गेल्या वर्षी गुप्तचर अहवालाचा हवाला देत म्हटले होते की, MBS यांनी जमालविरुद्धच्या ऑपरेशनला मान्यता दिली होती. पण त्यांचा दावा सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी साफ फेटाळून लावला.

बातम्या आणखी आहेत...