आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Women Who Were Abused By Dance Therapy Are Now Recovering From Shock And Loneliness; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:डान्स थेरपीतून अत्याचारपीडित महिला आता धक्क्यातून, एकटेपणातून सावरू लागल्या

किंशासा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कांगोमध्ये 20 वर्षांत 60 हजार लैंगिक पीडितांवर उपचारकिंशासा

आफ्रिकी देश कांगोमध्ये अनेक अत्याचारपीडित महिला आता त्या धक्क्यातून, एकटेपणाच्या काळोखातून बाहेर पडत आहेत. परंतु आता या पीडित महिलांनी स्वत:च्या शरीराशी नव्याने संवाद साधण्यासाठी डान्स थेरपीचा मार्ग निवडला आहे. पूर्व कांगोमधील सरकारी रुग्णालयाने यासाठी पुढाकार घेतला आहे. रुग्णालयात पुनर्वसन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर तेथे एका नृत्य शिक्षिकेचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे.

नृत्यशिक्षिका अमीना लसांबो म्हणाल्या, आम्हाला भेटलेल्या महिला वेगळ्याच शांततेत हरवलेल्या असतात. हे लक्षात घेऊन आम्ही त्यासाठी पुढाकार घेतला. अल्पवयात त्यांच्यावर अत्याचार झाला. त्या वेदना कशा प्रकारे मांडायच्या याची त्यांना काही कल्पना नाही.. आता बदल घडत आहे. पीडित महिला एका रांगेत उभ्या राहतात आणि नृत्यात हरवून जातात. त्या पुन्हा शरीराशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. तीन महिन्यांच्या सायकोथेरपीच्या तुलनेत एक महिन्याच्या नृत्यातून मोठा बदल दिसून येऊ शकतो, असे लुसाम्बो सांगतात.

रुग्णालयातील पुनर्वसन केंद्राची स्थापना नोबेल पुरस्कार स्त्रीरोगतज्ज्ञ डेनिस मुकवेंगे यांनी केली होती. मुकवेंगे कांगोमध्ये लैंगिक अत्याचारपीडित महिलांवर उपचार करतात. १९९९ मध्ये हे केंद्र स्थापन करण्यात आले. त्याच्या स्थापनेत महिलांचा सहभाग मोठा होता. त्यातही शस्त्रक्रियेतून जावे लागलेल्या पीडितांचा स्थापनेत मोठा वाटा राहिल.

नृत्योपचारातून पीडितांना मदत
लुसांबो यांच्या वर्गात सहभागी होणारी २० वर्षीय तरुणी म्हणाली, अज्ञात लोकांनी माझ्यावर अत्याचार करून मला मरणासन्न सोडून दिले होते. तेव्हापासून माझ्या मनात भीती, वेदना होती. परंतु आता नृत्यामुळे ती वेदना व भीती यातून मी मुक्त होत आहे. मला अलीकडे शांत झोपही लागते. नृत्यातून मला पुन्हा हसण्याची संधी मिळाली. अत्याचारानंतर तिच्या नातेवाइकांनी तक्रारदेखील केली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...