आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Women's Issues Under Discussion In South Korea's Presidential Election, Some Candidates Opposed |Mararhi News

निवडणूक:दक्षिण कोरियातील राष्ट्रपती निवडणुकीमध्ये महिलांचा मुद्दा चर्चेत, काही उमेदवारांना विरोध

सेऊल7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मतदानासाठी लागलेल्या रांगा. - Divya Marathi
मतदानासाठी लागलेल्या रांगा.
  • निवडणूक वरिष्ठ, व्यवस्थापकीय पदांवरील महिलांचे प्रमाण 15.6 टक्के

‘महिलांसाठी मते द्या,’ असे आवाहन करणाऱ्या एका उमेदवाराच्या विरोधात लाेकांनी एकजूट दाखवल्याची घटना गेल्या महिन्यात पाहायला मिळाली होती. दक्षिण कोरियात राष्ट्रपतिपदाची निवडणूक होऊ घातली आहे. निवडणुकीचे वारे वाहू लागले असून त्यात आपल्याला समर्थन मिळावे म्हणून एका उमेदवाराने महिलांचा मुद्दा उचलून धरला. त्याला महिलांसह सामान्य नागरिकांनी कडाडून विरोध केला. विरोध झालेल्या उमेदवाराचे नाव यून सुक याेल असे आहे. याेलने महिलांसाठी मते देण्याचे वक्तव्य करताच उपस्थित गर्दीतील महिला म्हणाल्या, याेन, तुम्ही राष्ट्रपतिपदाच्या याेग्यतेचे नाही. येथून निघून जा. देशातील वरिष्ठ तसेच व्यवस्थापकीय पदांवरील महिलांचे प्रमाण केवळ १५. ६ टक्के आहे. त्यावरून टीका होत आहे. सत्ताधारी डेमाेक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ली जे म्युंग व विरोधी पक्षाचे यून सुक याेल रिंगणात आहेत.

बातम्या आणखी आहेत...