आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Women's Right To Drive In Saudi From 2017, The Beginning Of The Era Of Women's Motorsports In Saudi Arabia; 15 Countries Participate In 'Women's Rally'| Marathi News

दिव्य मराठी विशेष:सौदीत 2017 पासून महिलांना वाहन चालवण्याचा अधिकार, सौदी अरेबियात महिला मोटरस्पोर्ट‌्स युगाची सुरुवात; ‘महिला रॅली’त 15 देश सहभागी

हेल (सौदी अरेबिया)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साैदी अरेबियामध्ये महिलांना २०१७ मध्ये वाहन चालवण्याचा अधिकार मिळाल्यानंतर प्रथमच ऑल वुमन रॅली “जमील’चे आयोजन करण्यात आले होते. “जमील’ हा अरबी शब्द आहे. त्याचा हिंदीत अर्थ “सुंदर” असा होतो. रॅलीला प्रिन्स अब्दुल अजीज यांनी हेलमधील किशला पॅलेस येथून हिरवा झेंडा दाखवला. या रॅलीने किंगडममधील महिला मोटरस्पोर्ट‌्स युगाची सुरुवात केली. यात इंग्लंड, जर्मनी, ओमान, स्पेन, स्वीडन आणि अमेरिकेसह १५ देशांतील स्पर्धक आणि ३५ संघ सहभागी झाले होते. त्यापैकी १७ महिला चालक सौदीच्या होत्या. जमील रॅलीमध्ये ३४० किमी ऑफ रोडसह ११०० किमीचे अंतर तीन टप्प्यांत पूर्ण करण्यात आले. या रॅलीत गुण मिळवण्याचे काही नियमही होते. त्यांचे पालन करून स्पर्धक या रॅलीत सहभागी झाले. रॅलीमध्ये वेगवान वाहनांनाही परवानगी देण्यात आली नाही. निर्धारित वेळेत परत न आलेल्या संघांना दंडही ठोठावण्यात आला. वेग आणि नेव्हिगेशनल अचूकता रॅलीमध्ये विजय निश्चित करते. परंतु रॅलीने सहभागींना ७० किमी ताशी वेग मर्यादा होती. तिन्ही टप्प्यात संघांना १४१ वे-पॉइंट्स मिळवायचे होते.

जेद्दाह येथील रहिवासी घटस्फोटित दोन मुलांची आई मनार अलेसयिक जी “२०१६ जी रेगलर’ चालवत हाेती, तिच्यासाठी आॅफ रोडिंग नवे नव्हते. मात्र, स्पर्धेदरम्यान अनेक गोष्टी मार्ग कठीण बनतात. पहिल्या दिवशी त्यांचा संघ दुसऱ्या स्थानी होता. तिसऱ्या दिवशी त्यांचा संघ १३ व्या स्थानी राहिला. हा स्पर्धेतील एक कठीण भाग आहे. जिंकण्यासाठी स्पर्धंक मेहनत घेतात.

बातम्या आणखी आहेत...