आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनानंतर बाजार खुले झाले, पण कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना अमेरिका व युरोपीयन देश करत आहेत. या देशांमध्ये मान व कंबरदुखीने त्रस्त हजारो लोकांनी नोकरी सोडली आहे. यापैकी बहुतांश लोकांना वर्क फ्रॉम होम करताना अनेक महिने चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे मान व कंबरदुखीचा त्रास होत आहे. ब्रिटनच्या ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सच्या अहवालानुसार, ३ वर्षांपूर्वी २०१९ मध्ये आजारामुळे काम न करू शकणाऱ्या लोकांची संख्या २० लाख होती. आता ती २५ लाख झाली आहे. यापैकी ६२ हजार लोकांना मान व पाठदुखीच्या त्रासासामुळे नोकरी सोडावी लागली. यूकेमध्ये मानसिक आजारांनंतर नोकरी सोडण्याचे हे दुसरे मोठे कारण आहे.
लंडनमधील बॅक्स अँड बियाँड क्लिनिकचे संचालक व अस्थिरोगतज्ज्ञ गेविन बर्ट सांगतात, २५ ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांमध्ये पाठ व मानदुखीची समस्या वेगाने वाढत आहे. अनेक तास लॅपटॉपवर वाकून काम केल्याने अनेक जण इतके आजारी पडले की ते बसून काम करण्याच्या स्थितीतच नाहीत. बर्ट सांगतात, कार्यालयात काम करण्यासाठी विशिष्ट प्रकारची डिझाइन असते. ती आपल्या शरीराला आधार देते. मात्र, घरांत बेडवर किंवा सोफ्यावर तासन्तास काम केल्याने शरीरात वेदना सुरू होतात. कोरोना महामारीमध्ये वर्क फ्रॉम होमचा ट्रेंड वाढला, पण घरी काम करण्याची कोणतीच व्यवस्था नव्हती. लोकांनी शरीराच्या हिशेबाने योग्य स्थितीत बसण्याकडे अधिक लक्ष दिले नाही. दीर्घकाळ शरीरावर ताण पडल्याने पाठ व मानदुखीचा त्रास झाला. वर्क फ्रॉम होम करणारे नोकरदार तरुण याचे सर्वाधिक शिकार झाले. घरांत चुकीच्या पद्धतीने बसून ते काम करत राहिले.
घरीच बनवा ऑफिससारखा सेटअप, मानेचा व्यायाम करा गेविन बर्ट सांगतात, पाठ व मानदुखीपासून सुटका करून घेण्यासाठी सर्वप्रथम रुग्णांनी हायब्रिड मोडमध्ये काम करणे सुरू करावे. जसे आठवड्यातून काही दिवस कार्यालयातून काम करावे व काही दिवस घरून. घरातही ऑफिससारखा सेटअप तयार करा. यामुळे शरीराची मुद्रा चांगली राहील. सतत बसून राहू नका. दर तासाला खुर्चीवरून उठा व हालचाल करा. बसल्याजागी मान फिरवण्याचा व्यायाम करा. कामावेळी पाणी प्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.